आजकाल लोकांना सोडा पिणे खूप आवडते. बहुतेक लोक इतर पेयांपेक्षा सोडा पिणे पसंत करतात. सोडा प्यायल्याने त्यांची गॅसची समस्या दूर होते, असे सगळ्यांनाच वाटते. सोड्याची लोकप्रियता पाहता, बरेच लोक आहारासोबतही सोडा पितात. कारण- त्यात साखरेचे प्रमाण फारच कमी आहे. परंतु, कदाचित आपल्याला हे जाणून आश्चर्य वाटेल की, सोडा आपल्या आरोग्यासाठी हानिकारक आहे.

रोज सोडा प्यायल्याने शरीरातील हाडे कमकुवत होण्याप्रमाणेच अनेक त्रासांना सामोरे जावे लागते. अशा परिस्थितीत तुम्हीही रोज सोडा पीत असाल, तर ही बातमी वाचाच… जास्त सोडा प्यायल्याने शरीरावर काय घातक परिणाम होतात हे जाणून घेऊ. सोड्यामध्ये अनेक प्रकारची रसायने आढळतात; जी शरीरासाठी हानिकारक असू शकतात. दररोज सोडा प्यायल्यामुळे केवळ वजनच वाढत नाही, तर त्याचा विपरीत परिणाम हृदय आणि रोगप्रतिकारशक्तीवरही होतो.

Fast Charging Ruin Your Phone Battery
Fast Charging Hurt Your Phone Battery: फास्ट चार्जिंगमुळे होऊ शकते तुमच्या फोनचे नुकसान? ‘या’ पाच समस्यांबद्दल आजच जाणून घ्या
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Liquor and fish stocks seized in Bhayander news
मतदारांना आमिषे दाखविण्यास सुरवात; भाईंदरमध्ये मद्य आणि मासळाची साठा जप्त
david dhawan advice huma qureshi on weight
“तुला खूप लोक सांगतील वजन कमी कर, सर्जरी कर, पण…”, हुमा कुरेशीला प्रसिद्ध दिग्दर्शकाने वजनाबद्दल दिलेला सल्ला, म्हणाली…
Rakul Preet Singh Diet
Rakul Preet Singh Diet : सकाळच्या नाश्त्यापासून रात्रीच्या जेवणापर्यंत; रकुलने सांगितले डाएटचे सीक्रेट, वाचा, तज्ज्ञ काय सांगतात….
diet of small babies, Health Special, Health tips,
Health Special: लहान बाळांचा आहार कसा असावा?
youth dies due to hot milk pot fell Shocking video viral
दारूची नशा बेतली जीवावर! मद्यधुंद तरुणाचा उकळत्या दुधाच्या कढईवर गेला तोल अन्…; वेदनादायी VIDEO

एका संशोधनानुसार, जास्त गोड पेय प्यायल्याने स्मरणशक्ती कमजोर होते. हिप्पोकॅम्पससारखी समस्या उदभवते. त्यामध्ये शिकण्यास आणि लक्षात ठेवण्यास मदत करणारा मेंदूचा भाग लहान होतो. सोड्यासारखे कृत्रिम पेय रोज पिणाऱ्या लोकांमध्ये स्मृतिभ्रंशाचा धोका सोडा न पिणाऱ्या लोकांपेक्षा तिप्पट असतो.

दम्याचा त्रास वाढण्याची शक्यता

जर तुम्हाला दमा असेल, तर तुम्ही सोड्याचे अजिबात सेवन करू नका. कारण- त्यामुळे दम्याचा त्रास आणखी वाढू शकतो. त्याचे कारण असे की, सोड्याचा टिकाऊपणा वाढावा यासाठी ( प्रिझर्व्हेटिव्ह) त्यात वापरला जाणारा सोडियम बेंझोएट हा पदार्थ दम्याचा त्रास वाढण्यास कारणीभूत ठरू शकतो. त्यामुळे आजार वाढू शकतात.

दाह वाढवण्यास कारणीभूत

सोड्यामुळे शरीरात केवळ जळजळच होत नाही, तर त्याचा रोगप्रतिकारशक्तीवरही विपरीत परिणाम होतो. त्याव्यतिरिक्त जीवघेणा आजार होण्याचा धोकाही वाढतो. या अभ्यासात असे दिसून आले आहे की, जे लोक दररोज सोडा पितात त्यांच्या शरीरात युरिक आम्ल जास्त प्रमाणात वाढलेले असते; जे शरीराचा दाह वाढवते.

हाडे कमकुवत होण्यास चालना

जे लोक जास्त सोडा पितात, त्यांची हाडे कमकुवत होऊ लागतात. कारण- सोड्यात आढळणारे फॉस्फरिक अॅसिड शरीरातून कॅल्शियम हळूहळू काढून टाकते.

हेही वाचा >> तुम्हाला जेवताना सॉफ्ट ड्रिंक पिण्याची सवय आहे? पाहा या सवयीबद्दलचा अभ्यास काय सांगतो ते….

हृदयरोगाचा धोका

रोज सोडा प्यायल्याने हृदयविकाराचा धोका वाढतो. त्यामुळे रोज सोडा पिणे टाळावे.

लठ्ठपणा समस्या

लठ्ठपणामुळे आपल्या रोगप्रतिकारक शक्तीवर परिणाम होतो आणि दररोज सोडा प्यायल्याने कमी वेळात जास्त चरबी तयार होते. सोडा फक्त कॅलरीज वाढवतो म्हणजे त्यात कोणतेही पौष्टिक घटक नाहीत.