बेंबी सरकणे (Naval Dislocation) ही एक अशी समस्या आहे जी कोणालाही कधीही त्रास देऊ शकते. बेंबी सरकली की पोटात दुखते, उलट्या, मळमळ, जुलाब, पचनक्रियेत गडबड यासारख्या समस्या होतात. या समस्येमुळे उठणे-बसणेही कठीण होते. बेंबी सरकण्याची समस्या कोणालाही कधीही होऊ शकते. जड वजन उचलणे, अचानक वाकणे, पायऱ्या चढताना आणि उतरताना स्नायूंना ताण पडणे, जास्त मसालेदार अन्न खाल्ल्याने अशी अनेक कारणे या समस्येची असू शकतात. एका पायावर बराच वेळ उभे राहूनही अनेक वेळा बेंबी सरकते.
बेंबी सरकण्याची ही समस्या काही लोकांना पुन्हा पुन्हा सतावते. जेव्हा ही समस्या उद्भवते तेव्हा बेंबी एकतर वर सरकते किंवा खाली सरकते. योगगुरू बाबा रामदेव यांच्या मते, जर बेंबी वरच्या दिशेने सरकली तर बद्धकोष्ठतेचा त्रास होतो आणि जर ती खाली सरकली तर जुलाबाचा त्रास होतो. बेंबी उजवीकडे आणि डावीकडे सरकल्यास संपूर्ण शरीराचे संतुलन बिघडू लागते. योग गुरूच्या मते, जर बेंबी सरकण्याची समस्या असेल तर काही घरगुती उपायांनी ती सहज दूर होऊ शकते. चला जाणून घेऊया घरी उपचार कसा करावा.
बेंबीवर पिठाचा दिवा ठेवावा
पिठाचा दिवा बनवून त्यात थोडे तेल टाकून तो दिवा बेंबीवर ठेवावा आणि त्यावर एक लहान वाटी उलटी करून ठेवावी. दिवा झाकून ठेवल्याने तो बेंबीला चिकटलेला दिसेल. काही वेळाने, जर बेंबी त्याच्या जागी आल्यास, वाटी दिव्यातून सहज बाहेर पडेल. दिव्यात ऑक्सिजन जेवढा जास्त वेळ राहील, तेवढा दिवा जळत राहील, नंतर त्यात पोकळी निर्माण होते, त्यामुळे पोट खेचले जाते आणि नाभी त्याच्या जागी येते.
उत्तनपादासन करा, बेंबीची समस्या लवकर बरी होईल
उत्तानपादासन करण्यासाठी पाय वर केले जातात. याचा नियमित सराव केल्याने शरीराला अनेक फायदे होतात. बेंबी सरकण्याच्या समस्येमध्ये या आसनाचा खूप फायदा होतो. नाभीचे संतुलन राखण्यासाठी हे आसन खूप प्रभावी ठरते. असे केल्याने बद्धकोष्ठता दूर होते, पोटदुखी दूर होते आणि बेंबी सरकल्याने होणारी सर्व लक्षणे दूर होतात. हे आसन दिवसातून दोनदा केल्याने तुमची बेंबी बरी होईल.
( हे ही वाचा: हस्तमैथुन केल्याने खरंच शुक्राणूंची संख्या कमी होते का? जाणून घ्या डॉक्टर काय सांगतात)
पवनमुक्तासन करा
ज्या लोकांना बेंबी सरकल्याने पाठदुखी आणि पोटदुखीच्या तक्रारी आहेत त्यांनी पवनमुक्तासन करावे. हे आसन केल्याने बद्धकोष्ठता आणि पोटदुखीची समस्या दूर होते. असे केल्याने मणक्याची लवचिकता वाढते. बेंबी सारकल्याने तुम्हाला त्रास होत असेल, तर त्यासाठी उत्तम उपाय म्हणजे योग.