खगोलशास्त्रानुशार चंद्र आणि सूर्य ग्रहण होत असलं तरी हिंदू पंचांगानुसार त्याला विशेष महत्त्व आहे. नव वर्ष २०२२ मध्ये एकूण चार ग्रहण आहेत. त्यापैकी २ सूर्यग्रहण आणि २ चंद्रग्रहण होतील. ग्रहण काळात पूजा वगैरे निषिद्ध मानले जाते हे आपणा सर्वांना माहीतच आहे. जाणून घ्या कधी आहेत ग्रहण
सूर्यग्रहण
तारीख: ३० एप्रिल, शनिवार
वेळ: दुपारी १२.१५ ते ०४.०७ पर्यंत
ग्रहण कसे असेल: खंडग्रास ग्रहण
कुठे दिसेल: दक्षिण/पश्चिम अमेरिका , पॅसिफिक अटलांटिक आणि अंटार्क्टिका
सुतक: भारतातून दिसणार नसल्याने सुतक मान्य नाही
चंद्रग्रहण
तारीख: १६ मे सोमवार २०२२
वेळ: सकाळी ०७.०२ ते दुपारी १२.२० पर्यंत
ग्रहण कसे असेल: पूर्ण चंद्रग्रहण
कुठे दिसेल: दक्षिण / पश्चिम युरोप, दक्षिण / पश्चिम आशिया, आफ्रिका, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, पॅसिफिक, अटलांटिक, अंटार्क्टिका, हिंदी महासागर आणि भारताचे काही भाग.
सुतक: सुतक काळ चंद्रग्रहणाच्या ९ तास आधी सुरू होतो आणि चंद्रग्रहणाच्या शेवटी संपतो. या ग्रहणकाळात सुतक काळ अधिक परिणामकारक असेल, त्यामुळे अधिक काळजी घ्यावी लागेल.
सूर्यग्रहण
तारीख: २५ऑक्टोबर, शनिवार
वेळ: संध्याकाळी ०४.२९ते संध्याकाळी ०५.४२ पर्यंत
ग्रहण कसे असेल: खंडग्रास ग्रहण
कुठे दिसेल: युरोप, दक्षिण/पश्चिम आशिया, आफ्रिका आणि अटलांटिक
सुतक: भारतातून दिसणार नसल्याने सुतक मान्य नाही
चंद्रग्रहण
तारीख: ८ नोव्हेंबर, मंगळवार
वेळ: दुपारी ०१.३२ ते संध्याकाळी ०७.२७
ग्रहण कसे असेल: पूर्ण चंद्रग्रहण
कुठे दिसेल: उत्तर/पूर्व युरोप, आशिया, भारत, ऑस्ट्रेलिया, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिकेच्या काही भागात
सुतक: सुतक काळ चंद्रग्रहणाच्या ९ तास आधी सुरू होतो आणि चंद्रग्रहणाच्या शेवटी संपतो. या ग्रहणकाळात सुतक काळ अधिक परिणामकारक असेल, त्यामुळे अधिक काळजी घ्यावी लागेल.
हिंदू पंचांगानुसार ग्रहण काळात या गोष्टी करू नयेत.
- या काळात कोणतेही शुभ कार्य किंवा नवीन कार्य करू नये.
- ग्रहणकाळात अन्न शिजवू नये किंवा खाऊ नये.
- देवाची पूजा आणि तुळशीच्या झाड आणि पानांना स्पर्श करू नये.
- घराबाहेर पडू नये किंवा घरात झोपू नये.
- गरोदर महिलांनी विशेष काळजी घ्यावी.
- चाकू व सुईचा वापर करू नये.