How To Do Bikini Wax: बिकिनी व्हॅक्स हा आजकाल नवीन ट्रेंड आहे. पार्लरमध्ये जाताना तुम्हालाही बिकिनी व्हॅक्सचा सल्ला मिळत असेल तर ते तुमच्यासाठी किती महत्त्वाचे आहे हे तुम्ही आधी ठरवले पाहिजे. बिकिनी व्हॅक्स हे एक्सटेंडेड व्हर्जन आहे आणि यामध्ये बिकिनी एरिया देखील व्हॅक्स केले जाते. जर तुम्ही बिकिनी व्हॅक्स करण्याचा विचार केला असेल, तर तुम्ही आधी त्याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेतली पाहिजे. खरं तर, पार्लरचे कर्मचारी अनेकदा महिलांवर बिकिनी व्हॅक्ससाठी दबाव आणतात, परंतु लोकांना हे माहित नसते की, ते त्यांच्यासाठी योग्य आहे की नाही. जर तुम्ही देखील पहिल्यांदाच बिकिनी व्हॅक्स करून घेत असाल तर ते करण्यापूर्वी तुम्ही काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

केस ट्रिम करणे आवश्यक आहे

जर तुम्ही पहिल्यांदाच बिकिनी व्हॅक्स करत असाल तर प्यूबिक हेअर ट्रिम करायला विसरू नका. यामुळे तुमच्या नको असलेल्या केसांची वाढ आणि वजन कमी होईल आणि व्हॅक्स लावणे सोपे होईल. म्हणूनच व्हॅक्सिंग करण्यापूर्वी तुम्ही स्वतः ट्रिमर घेऊन हे काम करू शकता.

केसांच्या लांबीची काळजी घ्या

बिकिनी व्हॅक्स करताना हे लक्षात ठेवावे लागते की, बिकिनी लाइन केसांची लांबी किती आहे. या केसांची लांबी एवढी असावी की ते व्हॅक्सिंग पट्टीतून सहज काढता येतील. ते खूप लहान नसावेत, अन्यथा त्यांना साफ करण्यात अडचण येऊ शकते.

हेही वाचा- रुसलेल्या जोडीदाराला कसे मनवावे? जाणून घ्या सोपी ट्रिक्स, चुटकीसरशी राग होईल शांत; नात्यामध्ये वाढेल प्रेम

बिकिनी व्हॅक्स करण्यापूर्वी एक्सफोलिएशन गरजेचे

बिकिनी व्हॅक्स करण्याआधी, त्या भागाचे केस व्यवस्थित एक्सफोलिएट केले पाहिजेत. यामुळे तुमच्या बिकिनी भागाची त्वचा मऊ होईल आणि प्यूबिक हेअर काढणे सोपे होईल.

मासिक पाळीदरम्यान बिकिनी व्हॅक्स टाळा

जर तुमची मासिक पाळी आली असेल तर तुम्ही बिकिनी व्हॅक्स टाळावे. एवढेच नाही तर मासिक पाळी सुरू होण्याच्या दोन ते तीन दिवस आधी आणि मासिक पाळीनंतर दोन ते तीन दिवस बिकिनी व्हॅक्स करू नये. वास्तविक, मासिक पाळी दरम्यान त्वचा खूप संवेदनशील होते आणि अशा स्थितीत बिकिनी व्हॅक्समुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो.

हेही वाचा – शरीरावर खूप तीळ आहेत पण तुम्हाला ते आवडत नाही? मग ते हटवण्यासाठी सोपे घरगुती उपाय करुन पाहा

नंबिंग क्रीम वापरली जाऊ शकते

जर बिकिनी व्हॅक्समुळे तुमच्या त्वचेला त्रास होत असेल, तर तुम्ही नंबिंग क्रीम वापरू शकता (हे क्रीम लावल्यानंतर तुम्हाला वेदना होत नाहीत), पण त्याआधी पॅच टेस्ट करणे आवश्यक आहे.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Know these important things before getting bikini wax done snk