Viral Video : गेल्या काही वर्षात हार्ट अटॅक ची अनेक प्रकरणे समोर आलेली आहे. तरुणांपासून वृद्धांपर्यंत अनेक जणांचा हॉर्ट अटॅकनी मृत्यू झाला आहे. हार्ट अटॅकला हा कोणत्याही वयात येऊ शकतो. अचानक छातीत कळ येणे, छाती दुखणे, घाम येणे आणि थकवा जाणवणे ही हार्ट अटॅक येण्यापूर्वीची प्राथमिक लक्षणे आहे. सोशल मीडियावर असे अनेक व्हिडीओ व्हायरल होतात ज्यामध्ये चालता बोलता लोकांना हार्ट अटॅक आल्याचे दिसून आले आहेत. आपल्यासमोर अचानक एखाद्याला हार्ट अटॅक आला तर काय करावे, हे अनेकांना सुचत नाही पण अशावेळी सीपीआर द्यावा. सीपीआर म्हणजे कार्डिओपल्मोनरी रिसुसिटेशन. आता काही लोकांना प्रश्न पडला असेल सीपीआर कसा द्यावा. आज आपण याविषयीच सविस्तर जाणून घेणार आहोत. सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये सीपीआर कसा द्यावा, याचे प्रशिक्षण दिले जात आहे. सध्या हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की पोलिसांना सीपीआर कसा द्यावा याविषयी प्रशिक्षण दिले जात आहे. व्हिडीओत तुम्हाला एक पोलीस अधिकारी आणि त्यांच्या शेजारी आणखी एक व्यक्ती दिसेल. या दोघांसमोर एक पुतळा ठेवलेला आहे. एक व्यक्ती त्यांना सीपीआर कसा द्यावा, याविषयी सांगताना दिसत आहे.
व्हिडीओत सांगितल्याप्रमाणे जर एखाद्या व्यक्तीला हार्ट अटॅक आला असेल तर सुरुवातीला त्याच्या छातीवर दोन्ही भागाला हाताने थापा जर त्यावर त्या व्यक्तीची कोणतीही प्रतिक्रिया आली नाही तर त्याचे पल्स तपासा गळ्याजवळ दोन बोट लावून १० सेकंद ठेवा. जर पल्स काम करत नसेल तर समजा हृदय बंद आहे. अशावेळी तु्म्ही डॉक्टरांना फोन करा आणि सांगा की असा रुग्ण येथे आहे. लगेच रुग्णवाहिका पाठवा. त्यानंतर हातावर हात ठेवून एका हाताची बोटे दुसऱ्या हाताच्या बोटांमध्ये टाकून दोन्ही हात रुग्णाच्या छातीवर ठेवा आणि दाब द्या आणि तीस सेकंद दाब देत राहा. त्यानंतरही कोणतीही प्रतिक्रिया रुग्ण देत नसेल तर त्याचे नाक दाबून तोंडाद्वारे श्वास द्या. अशाप्रकारे तुम्ही सीपीआर देऊ शकता.
पाहा व्हायरल व्हिडीओ
cops_vaibhav_mali100 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “सगळ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा व्हिडीओ आहे आपल्याला केव्हाही याची गरज पडू शकते. लोकांसाठी नाही तर आपल्या परिवारासाठी तर हे आपण नक्कीच करू शकतो आणि त्यांचा जीव वाचवू शकतो. जास्तीत जास्त शेयर करा”
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “मी पण कॅम्प करून आलोय या प्रथमोपचारचा.. सीपीआर कसा देतात हे पण ट्रेनिंग घेऊन आलो आहे मलाही जीवनात त्याचा फायदा होईल” तर एका युजरने लिहिलेय, “खूप छान संदेश दिला दादा तुम्ही….” आणखी एका युजरने लिहिलेय, “हे घराघरात सगळ्यांना देता आले पाहिजे” अनेक युजर्सना हा व्हिडीओ खूप आवडला. काही युजर्सनी छान माहिती दिली असल्याचे लिहिलेय.