आपल्या आहारपद्धतीचं आपण निरीक्षण केलं तर एक गोष्ट आपल्या लक्षात येईलच ती म्हणजे प्रत्येक ऋतूप्रमाणे आपला आहार बदलत असतो. आता हिवाळा सुरू आहे. हिवाळ्यात भूक जास्त लागते. त्यामुळे शरीराला अधिकाधिक उर्जा देणाऱ्या पदार्थांची आवश्यकता असते. म्हणूनच या ऋतूत होणाऱ्या विकारांना दूर ठेवणारे, नैसर्गिकरित्या सहज मिळणारे आणि शरीरात उष्णता निर्माण करणारे पदार्थ जरूर खावेत. त्यातून स्निग्ध पदार्थ, अक्रोड, बदाम, दही, पालक, गाजर, बार्ली यांचा समावेश आहारात आवर्जून केला पाहिजे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

…म्हणून काकडी फ्रिजमध्ये ठेवून खाऊ नये

शूजमधून येणारी दुर्गंधी कशी घालवाल?

– या ऋतूमध्ये पचनशक्ती चांगली असते. भूक चांगली लागते आणि पचनही चांगले होते त्यामुळे भरपूर खाल्ले तरी हरकत नाही. पण, दोन जेवणांमधले अंतर मात्र जास्त असता कामा नये. ज्या पदार्थांमुळे जास्तीत जास्त उर्जा शरीराला मिळेल असे पदार्थ थोड्या थोड्या फरकानं खाणं फायदेशीर ठरेल.
– या काळात न्याहारी सकाळी ७ ते ८.३० पर्यंत, दुपारी १२ ते २ या वेळेत जेवण, सायंकाळी ४ ते ५ दरम्यान हलका नाश्ता आणि रात्री ८ ते ९ दरम्यान रात्रीचे जेवण अशा वेळा शक्यतो पाळाव्यात. चार महिने आपल्या खाण्याच्या सवयीमध्ये हा बदल करून पाहायला हरकत नाही.
– मधुमेहाच्या रुग्णांनी थंडीच्या काळात नाश्त्याची वेळ पाळली तर शरीरातल्या साखरेचे प्रमाण घसरण्याची शक्यता कमी होते.
– दिवसभरातल्या जेवणांमध्ये सकाळची न्याहारी जास्त चांगली असावी. त्यात सुकामेव्याचा समावेश जरूर करावा