कोकणी खाद्यसंस्कृती ही विविध पाककृतींनी समृद्ध आहे. यामुळे केवळ देशातीलच नाही तर आता जगभरातील खाद्यप्रेमींना कोकणी पदार्थ भुरळ घालताना दिसतात. कोकणी पद्धतीने बनवलेले चिकण आणि मासे अनेकांना फार आवडतात. विशेषत: कोकणी पद्धतीने बनवलेले माशाचे कालवण पाहिले तरी अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते. त्यामुळे आज आपण खास कोकणी पद्धतीने झणझणीत वाम माशाचे कालवण कसे बनवायचे याची रेसिपी पाहणार आहोत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वाम माशाचे कालवण बनवण्यासाठी लागणारे साहित्य

१ वाम मासा

२ कांदे

१ टोमॅटो

७ ते ८ लसूण पाकळ्या

१ ते ६ आले चा तुकडा

५ खोबरे चे तुकडे छोटे छोटे

१/८ टीस्पून हळद

१/८ टीस्पून गरम मसाला

१/८ टीस्पून धणे पावडर

२ टी स्पून लाल तिखट

चवीनुसार मीठ घालावे

तेल

अर्ध लिंबू

बारीक चिरलेली कोथिंबीर

वाम माशाचे कालवण बनवण्याची पद्धत

१) सर्वप्रथम वाम माशाचे तुकडे करून स्वच्छ धुवून घ्यावे, मग ते एक प्लेटमध्ये काढून त्यावर हळद, गरम मसाला, धणे पावडर मीठ, लिंबाचा रस घालून सर्व मिश्रण माशाला लावून घ्यावे मग थोड्या वेळ तसेच ठेवून द्यावे.

२)कांदे, टोमॅटो, कोथिंबीर आले, खोबरे, लसूण पाकळ्या, हे सर्व चिरून घ्यावे मग एक कढईमधे तेल गरम करून त्यात हे सर्व भाजून घ्यावे मग थंड झाल्यावर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून बारीक वाटून घ्यावे.

३) मग एक कढईमधे तेल घालून त्यात मसाला घालून थोडे वेळ परतून घ्यावे मग त्यात लाल तिखट, चवीनुसार मीठ घालावे मग त्यात पाणी घालून झाकण ठेवून मंद आचेवर शिजू द्यावे. करी थोडे कमी झाल्यावर त्यात वाम माशाचे तुकडे घालून थोडे वेळ शिजू द्यावे.

४) अशाप्रकारे वाम माश्याचे झणझणीत कालवण तयार आहे. एक प्लेटमध्ये काढून वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून गरम गरम भाकरी, भाताबरोबर किंवा चपाती बरोबर सर्व्ह करावे.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Konkani fish recipe vam fish curry recipe in marathi how to make vaam eel fish kalva sjr