coal is a cheaper alternative for charcoal masks : सध्या सोशल मीडियावर अनेक कंटेन्ट क्रिएटर, इन्फ्लुएन्सर तुमच्या त्वचेशी संबंधित हॅक व टिप्स शेअर करतात. पण, या गोष्टी तुम्हालादेखील भुरळ घालू शकतात. कारण आज असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला, जेव्हा इन्स्टाग्राम युजर मनप्रीत कौरने चारकोल मास्कऐवजी (Charcoal mask ) कोळशाच्या मास्कसाठी स्वस्त पर्याय सुचवला. हे ऐकून आमच्याही डोळ्यांवर आणि कानांवर विश्वास बसला नाही. यासाठी तिने सुचवलं की, तुम्हाला फक्त कोळश्याचा वापर करायचा आहे; तर या हॅकबद्दल स्कीन डर्मेटोलॉजिस्टचे काय म्हणणे आहे हे जाणून घेऊ या…

इन्स्टाग्राम युजर व्हिडीओत म्हणाली की, तिने चारकोल मास्क (Charcoal mask) कधीच विकत घेतला नाही. तिने घराजवळच्या व्यक्तीकडून कोळसा घेतला. त्याचे तुकडे करून मिक्सरमध्ये बारीक केले. त्यानंतर हे सर्व एका भांड्यात काढून घेतलं. त्यात अर्ध्या लिंबाचा रस घातला आणि तीन ते चार तास झाकून ठेवलं. ते सुकल्यानंतर त्याला गाळून घेतले आणि ते पुन्हा फिल्टर केले. ती पुढे म्हणाली, हा नैसर्गिक चारकोल मास्क आहे, जे ब्रँड विकतात त्यापेक्षा खूप वेगळा आहे. या पावडरबरोबर तुम्ही मुलतानी माती किंवा बेसन वापरू शकता.

हेही वाचा…Share Toothbrush : तुमचा टूथब्रश तुम्ही जोडीदाराबरोबर शेअर करता का? मग थांबा! डेंटिस्ट काय म्हणतात एकदा वाचा…

पण, या हॅकबद्दलचे सत्य जाणून घेण्यापूर्वी चारकोल मास्क म्हणजे काय आणि ते कसं काम करतं हे समजून घेऊ…

चारकोल मास्कमध्ये ॲक्टिव्हेटेड चारकोल असते. अति उष्णतेच्या संपर्कात आल्यानंतर तयार होणारी एक बारीक काळी पावडर असते; ज्यामुळे चेहऱ्यावर लावल्यानंतर त्याला थोडे छिद्र पडतात, ज्यामुळे ते चेहऱ्यावरील ब्लॅकहेड्स शोषून घेतात; असे स्कीन केअर क्लिनिकमधील डर्मेटोलॉजिस् आणि कॉस्मेटोलॉजिस्ट डॉक्टर शरीफा चाऊस यांनी सांगितले. चारकोल मास्क त्वचेतील अशुद्धता काढून टाकण्यास मदत करतो, मुरुमांवर उपचार करतो. तसेच जास्त तेलकट त्वचेसाठी हा बेस्ट पर्याय आहे. पण, ज्यांची त्वचा सेन्सेटिव्ह किंवा कोरडी असेल त्यांनी चारकोल मास्क (Charcoal mask) वापरणे टाळावे.

या दाव्यात काही सत्य आहे का?

नवी दिल्लीचे अभिवृत एस्थेटिक्सचे सह-संस्थापक, कॉस्मेटोलॉजिस्ट आणि त्वचातज्ज्ञ जतिन मित्तल यांनी हा व्हायरल दावा खोडून टाकत ‘नाही’ असं उत्तर दिले. तसेच ते पुढे म्हणाले की, स्किनकेअर करण्यासाठी कोळशाचा वापर करणे हा योग्य मार्ग नाही. कोळसा, लिंबू मिसळून चेहऱ्यावर लावल्यास, त्वचेचा दाह होतो. पण, याउलट चारकोल मास्कमध्ये (Charcoal mask) ॲक्टिव्हेटेड चारकोल मिसळला जातो; जो त्वचेतील अशुद्धता, विषारी पदार्थ आणि डाग प्रभावीपणे काढून टाकतो; असे डॉक्टर मित्तल यांनी ठामपणे सांगितले. तसेच अशा उपायांबद्दल सावधगिरी बाळगण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. तुमच्या स्कीन केअरसाठी गूगल किंवा इन्स्टाग्राम युजर्सचे असे उपाय करून पाहू नका, त्वचेला इजा करू नका, त्याऐवजी तज्ज्ञांचा सल्ला घ्या…

(टीप : स्कीन केअरसाठी एखादा उपाय करून पाहण्यापूर्वी आरोग्य चिकित्सकाचा सल्ला घ्या…)