भारतात सर्वाधिक लोकप्रिय असलेली स्पोर्ट्स बाइक कंपनी KTM लवकरच आपली नवी बाइक Duke 790 लाँच करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अनेक दिवसांपासून Duke 790 बाबत स्पोर्ट्स बाइकप्रेमींमध्ये चर्चा सुरू आहे. बजाज कंपनीने नुकताच या नव्या बाइकचा टीझर जारी केला आहे. टीझरमध्ये बाइकबाबत सर्व माहिती देण्यात आलेली नसली तरी या टीझरमुळे कंपनी लवकरच ही बाइक भारतात लाँच करणार असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नव्या KTM Duke 790 मध्ये 799cc लिक्विड कुल पॅरेलल ट्विन इंजिन देण्यात आलं आहे. हे इंजिन 103bhp पावर आणि 87Nm टॉर्क जनरेट करतं. इंजिनसोबत 6 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स देखील आहे. या बाइकमध्ये क्विक शिफ्टरचा पर्याय देण्यात आला आहे, याद्वारे क्लच न दाबताही गिअर बदलता येणं शक्य आहे. KTM Duke 790 मध्ये 14.0 लीटरची पेट्रोल टाकी देण्यात आली असून ही बाइक एक लीटर पेट्रोलमध्ये 23 किमीपर्यंत धावू शकते असा कंपनीचा दावा आहे.

फीचर्स –
बाइकमध्ये सपोर्ट्स नेकेड बॉडी, शार्प फीचर्स आणि अॅट्रॅक्टिव्ह पेंट स्कीम्स आहे. 43mm WP अपसाइट डाउन फोर्क्स या बाइकला आहे. मागील बाजूला WP मोनो-शॉक आहेत. बाइकच्या पुढील बाजूला 300mm डिस्क ब्रेक तर मागील बाजूला 240mm सिंगल डिस्क ब्रेक आहे. तसंच या बाइकमध्ये स्टँडर्ड 9MP ड्युअल चॅनल ABS सिस्टीमदेखील असून यामध्ये सुपरमोटो मोडचा पर्यायही आहे. या बाइकची किंमत 6 ते 7 लाख रुपयांपर्यंत असण्याची शक्यता आहे.

 

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ktm duke 790 official teaser launched