कुळीथ डाळ ही फारशी प्रसिद्ध नाही पण या डाळीचे आश्चर्यकारक फायदे तुम्हाला तंदुरुस्त ठेवण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. तसेच बहुतेक लोकं तुर, मसूर, मूग अशा डाळीचे सेवन करतात. त्याच बरोबर शरीरातील प्रथिनांची कमतरता भरून काढण्यासाठी काहींना आहारात कडधान्ये घेणे आवडते. मात्र कुळीथ डाळ फार कमी लोकं खातात. तसेच इतर डाळींप्रमाणेच प्रथिने समृद्ध असण्याबरोबरच, कुळीथ डाळ इतर पोषक तत्वांनी देखील समृद्ध आहे. चला तर मग जाणून घेऊया त्याचे फायदे.

कुळीथ डाळीचे दक्षिण भारतात जास्त पीक घेतले जाते

अहवालानुसार, कुळीथ डाळीची लागवड बहुतांशी दक्षिण भारतात केली जाते. रसम आणि सांबरसारख्या दक्षिण भारतीय पदार्थांमध्ये कुळिथाची डाळ मोठ्या प्रमाणात वापरली जाते. गडद तपकिरी रंगाची असल्यानं ही डाळ थोडीशी मसूराच्या डाळीसारखी दिसते.

triphala in excess is beneficial or harmful for health
जास्त प्रमाणात त्रिफळाचे सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर की घातक? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत..
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
Gelatin used for sweets jams jellies candies will be made from boiler chicken waste Nagpur
मिठाई, जाम, जेली, कँडीसाठी वापरले जाणारे ‘जिलेटीन’ आता बॉयलर कोंबडीच्या वेस्टपासून बनणार…
kalyan ganeshotsav 2024
कृत्रिम तलावांमध्ये गणपती विसर्जन करणाऱ्या गणेश भक्तांचा आयुक्तांच्या हस्ते सन्मान, जलप्रदूषण रोखण्यासाठी कडोंमपाचा उपक्रम
drinking hot lemon water in a copper pot
तांब्याच्या भांड्यात गरम लिंबू पाणी प्यायल्याने विषबाधा होऊ शकते? तज्ज्ञांनी मांडले मत..
Is blackcurrant and chia seed water really beneficial for health Get expert advice l काळ्या मनुक्यांचे आणि चिया सीड्सचे पाणी आरोग्यासाठी खरंच फायदेशीर आहे का? जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला
काळ्या मनुक्यांचे आणि चिया सीड्सचे पाणी आरोग्यासाठी खरंच फायदेशीर आहे का? जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला
drugs worth rs 2 crore seized from nigerian in nalasopara
नालासोपारा बनले अमली पदार्थांचे केंद्र; परदेशी व्यक्तीकडून २ कोटींचे अमली पदार्थ जप्त
Nisargalipi Fascinating World of Aquatic Plants
निसर्गलिपी : पाणवनस्पतींची मोहक दुनिया

हृदयाचे आरोग्य ठेवते तंदुरुस्त

हृदय निरोगी ठेवण्यासाठी कुळीथ डाळ खूप उपयुक्त आहे. पौष्टिकतेने युक्त कुळीथ डाळ नियमित खाल्ल्याने हृदयविकार टाळता येतात. त्यामुळे आजच या डाळीचा आहारात समावेश करा, जेणेकरून तुमचे हृदय तंदुरुस्त राहते.

कुळीथ डाळ मधुमेही रुग्णांसाठी फायदेशीर

मधुमेह या आजारातही कुळीथ डाळ खाण्याचे अनेक फायदे आहेत. पौष्टिक गुणधर्मांमुळे कुळीथ डाळ रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्याचे काम करते. कारण कुलथी डाळ ही अनेक फायद्यांनी परिपूर्ण आहे.

Weight Loss: वजन वाढलं आहे का? कमी करायचं असल्यास ‘हा’ आहे प्रभावी उपाय, जाणून घ्या

कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहते

कोलेस्ट्रॉल नियंत्रणात कुळीथ डाळ अतिशय उपयुक्त आहे. ही डाळ शरीरातील LDL म्हणजेच वाईट कोलेस्ट्रॉल कमी करून HDL म्हणजेच चांगले कोलेस्ट्रॉल वाढवण्यास मदत करते. त्यामुळेच कुळीथ डाळीचे सेवन केल्याने कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते.

बद्धकोष्ठता दूर होते

तुम्हाला जर बद्धकोष्ठतेची समस्या सतावत असेल तर कुळीथ डाळ तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. कारण कुळिथाच्या डाळीमध्ये भरपूर फायबर आढळतं. यामुळंच या डाळीचं सेवन केल्यानं पचनक्रिया चांगली राहते आणि बद्धकोष्ठता, अॅसिडिटी यासारख्या समस्या दूर होतात.