कुमारवयीन मुले कमी झोपत असतील, तर त्यांची शरीरयष्टी स्थूल होण्याची शक्यता अधिक असते, असे न्यूझीलंडमध्ये झालेल्या संशोधनात आढळून आले. मात्र, त्याचवेळी कुमारवयीन मुली जर कमी झोपत असतील, तर त्यांच्या शरीरयष्टीवर त्याचा कोणताही परिणाम होत नाही, असेही संशोधकांना आढळले.
न्यूझीलंडमधील ओटॅगो विद्यापीठातील पोषण आहारशास्त्र विषयातील संशोधकांनी या विषयावर संशोधन केले. १५ ते १८ वयोगटातील मुले जर कमी झोपत असतील, तर ते जाड होण्याची शक्यता असते. त्याचवेळी याच वयोगटातील मुली कमी झोपत असतील, तर त्यांच्या शरीरावर कोणताही परिणाम होत नाही, असे आढळून आले.
एकूण ३८६ मुलांच्या आणि २९९ मुलींच्या झोपण्याच्या सवयी, त्यांची उंची, वजन आणि शरीरावरील चरबीचे गुणात्मक प्रमाण यांचा अभ्यास संशोधकांनी केला. मुलांमध्ये झोपेचा आणि शरीरयष्टीचा परस्पर संबंध असतो. त्याचवेळी मुलींमध्ये अशाप्रकारचा कोणताही संबंध नसतो, असे संशोधनाच्याशेवटी आढळल्याचे प्रमुख संशोधिका डॉ. पाऊला स्किडमोर यांनी सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा