Ladyfinger Face Pack: कोणत्याही ऋतूमध्ये आरोग्याचीच नव्हे तर, त्वचेचीही विशेष काळजी घेणे गरजेचे असते. आपली त्वचा ही अनेक थरांनी बनलेली असते या थरांमध्ये नवे नव्या पेशी सतत बनत असतात आणि नष्ट होत असतात. यावेळी निरोगी आणि चमकदार त्वचेसाठी बरेच लोक फेसमास्क वापरतात. परंतु, फेसमास्क लावताना काही गोष्टीची काळजी घेणे गरजेचे असते. कधीकधी आपली त्वचा निस्तेज आणि निर्जीव दिसू लागते. अशा परिस्थितीत हे फेस मास्क त्वचेवर नैसर्गिक चमक आणतात. अनेकदा आपण विकतचे फेसमास्क वापरतो आणि त्याचे त्वचेवर इनफेक्शन होते. मात्र आज आम्ही तुम्हाला घरी बनवू शकतो असा सोपा फेसमास्क सांगणार आहोत. अनेकांना भेंडीची भाजी आवडत नाही मात्र भेंडी जशी आरोग्यासाठी चांगली असते तशीच चेहऱ्यासाठीही असते.
जर तुम्हीही तुमच्या चेहऱ्यावरील पिंपल्स आणि डागांमुळे त्रस्त असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. आज आम्ही तुम्हाला भेंडीच्या वापराविषयी सांगणार आहोत. याचा वापर करून तुम्ही तुमचा चेहरा चमकदार आणि डागरहित करू शकता.
भेंडीचा वापर
चेहऱ्यावर भेंडी वापरण्यासाठी तुम्ही त्याचा फेस पॅक बनवू शकता. फेस पॅक बनवण्यासाठी तुम्हाला १० ते १२ भेंडी धुवून वाळवाव्या लागतील, नंतर त्यांना मिक्सरमध्ये बारीक करून घट्ट पेस्ट बनवावी लागेल. आता ही पेस्ट चेहऱ्यावर आणि मानेवर २० मिनिटांसाठी लावा. थोडे कोरडे झाल्यावर पाण्याने धुवा.
भेंडीचं पाणी
तुम्ही घरी भेंडीचं पाणी देखील बनवू शकता. यासाठी तुम्हाला १० भेंडी धुवून त्याचे छोटे तुकडे करावे लागतील, नंतर मिक्सरमध्ये बारीक करून त्याचा रस काढा. त्यात थोडे पाणी मिसळा, जेणेकरून ते पातळ होईल, मग तुम्ही ते स्प्रे बाटलीत भरून चेहऱ्याला लावू शकता.
भेंडी तेल
भेंडीचं तेल बनवण्यासाठी, तुम्हाला १० ते १२ भेंडी धुवून वाळवाव्या लागतील, नंतर त्यांचे लहान तुकडे करा आणि त्यांना तेलात सोनेरी होऊ द्या. ते थंड झाल्यावर गाळून त्यात खोबरेल तेल टाका.
भेंडीचा फेस पॅक
७ ते ८ भेंडी घ्या, धुवून स्वच्छ करा नंतर मिक्सरमध्ये बारीक करा आणि त्यात दही आणि ऑलिव्ह ऑइल घालून पेस्ट बनवा. आपण त्यात थोडे पाणी घालू शकता. आता हा फेस पॅक १५ मिनिटांसाठी चेहऱ्यावर लावा, काही वेळाने धुवा.
चेहऱ्यावर भेंडी लावण्याचे फायदे
भेंडी खाण्यासाठी स्वादिष्ट असण्यासोबतच त्वचेसाठी देखील खूप फायदेशीर मानले जाते. यामध्ये व्हिटॅमिन ए, सी आणि के सारखे पोषक घटक आढळतात, जे आपली त्वचा निरोगी ठेवण्यास मदत करतात. जर तुम्ही भेंडीचा फेस पॅक वापरत असाल तर तुमच्या चेहऱ्यावरील मुरुम आणि डाग कमी होतील आणि त्वचेही हायड्रेट होईल.
पॅच टेस्ट करा
याशिवाय चेहऱ्यावर भेंडी लावल्याने सुरकुत्या आणि रेषा कमी होतात आणि त्वचा मुलायम होते. भेंडीचा फेस पॅक वापरण्यापूर्वी, पॅच टेस्ट करा कारण काही लोकांना त्याची ॲलर्जी असू शकते. ऍलर्जीच्या बाबतीत, नक्कीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.