Lal Bhoplyachi Bhaji : पितृपक्षामध्ये पितरांना नैवद्य दाखवला जातो. पितृपक्षाच्या या थाळीमध्ये विविध पदार्थ बनवले जातात. या नैवद्याच्या थाळीत लाल भोपळ्याच्या भाजीला विशेष महत्त्व आहे. अनेक जणांना लाल भोपळ्याची भाजी आवडत नाही पण या खास पद्धतीने तुम्ही स्वादिष्ट भोपळ्याची भाजी बनवू शकता. जाणून घ्या ही सोपी रेसिपी.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

साहित्य :

  • भोपळ्याच्या बारीक चिरलेल्या फोडी
  • दही
  • शेंगदाणे
  • जिरे
  • मोहरी
  • मेथी दाणे
  • तेल
  • कडीपत्ता
  • हिरवी मिरची
  • कोथिंबीर
  • साखर
  • मीठ

हेही वाचा : पितृपक्ष नैवद्य थाळीसाठी चणा डाळीचे वडे करताय? असे बनवा स्वादिष्ट वडे, ही सोपी रेसिपी लगेच नोट करा

कृती :

  • लाल भोपळ्याची सुरुवातीला साल काढून घ्यावी
  • त्यानंतर कुकरमध्ये पाणी घालून भोपळ्याच्या फोडी शिजवून घ्या.
  • कुकरमध्ये भोपळा शिजल्यानंतर हाताने मॅश करा.
  • त्यात दाण्याचा कूट, दही, साखर आणि चवीनुसार मीठ टाका.
  • पॅनमध्ये तेल गरम करा.
  • त्यात जिरे, जिरे मेथी दाणे, कडीपत्ता टाका.
  • हिंग, हळद घालून फोडणी द्या.
  • त्यात मॅश केलेल्या भोपळ्याच्या फोडी टाका.
  • थोडावेळ शिजू द्या
  • वरुन कोथिंबीर घालून सर्व्ह करा.
मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lal bhoplyachi bhaji recipe how to make red pumpkin sabji in pitru paksha food lovers food news in marathi ndj