लँड रोव्हर इंडियाने भारतात आपली नवी एसयुव्ही ‘2019 डिस्कव्हरी स्पोर्ट लँडमार्क एडिशन’ लाँच केली आहे. हे स्पेशल एडिशन असून याची किंमत(एक्स शोरुम) कंपनीने 53.77 लाख रुपये ठेवली आहे. नवीन कारमध्ये केबिन अपडेट्ससह डिझाइनमध्येही बदल करण्यात आला आहे.

9.9 सेकंदांमध्ये ही कार 0 ते 100 किमी प्रतितास वेग पकडते. 188 किमी प्रतितास इतका या कारचा टॉप स्पीड आहे. ही कार नार्विक ब्लॅक, युलोंग व्हाइट आणि कोरी ग्रे अशा तीन रंगांमध्ये उपलब्ध असेल. आतील बाजूला कारच्या केबिनमध्ये ईबोनी ग्रेनर्ड लेदर सीट्स आहेत. पुढील बाजूला दिलेल्या बंपरमुळे या गाडीला आकर्षक स्पोर्ट्स लूक मिळालं आहे. या कारमध्ये एक 825W मेरिडियन सराउंड साउंड सिस्टीम आहे, यामध्ये 16 स्पीकर आणि एक दुहेरी चॅनल सबवुफरचा समावेश आहे. तसंच या कारमध्ये हेड-अप डिस्प्ले, 360 सराउंड कॅमेरा, क्लायमेट कंट्रोल, पार्क असिस्ट यांसारखे अनेक अद्ययावत फीचर्स आहेत. दर्जेदार परफॉर्मन्स मिळावा यासाठी कारमध्ये ‘टेरेन रिस्पाँस सिस्टीम’ आहे. हे सिस्टीम सभोवतालच्या परिसरानुसार गाडीच्या कामगिरीचं निरीक्षण करतं आणि आवश्यक ते बदल करतं, असा कंपनीचा दावा आहे.

या कारमध्ये 2.0 लीटरचं Ingenium डीझेल इंजिन देण्यात आलं आहे. हे इंजिन 178 बीएचपी पावर आणि 430 एनएम पीक टॉर्क जनरेट करतं. याशिवाय इंजिनमध्ये ऑटोमेटिक पद्धतीचं 9-स्पीड ट्रांसमिशन आहे.

Story img Loader