चंद्रग्रहण असो किंवा सूर्यग्रहण, दोन्ही धार्मिक श्रद्धेनुसार अशुभ मानले जातात. असे मानले जाते की ग्रहण दरम्यान, पृथ्वीवरील सर्व सजीवांवर नकारात्मक परिणाम होतो. शास्त्रज्ञांच्या मते, जेव्हा पृथ्वी सूर्य आणि चंद्राच्या मध्ये येते, तेव्हा चंद्रावर प्रकाश नसतो, या स्थितीला चंद्रग्रहण म्हणतात. या वर्षातील दुसरे चंद्रग्रहण शुक्रवार, १९ नोव्हेंबर २०२१ या दिवशी लागणार आहे. दरम्यान १९ नोव्हेंबरला चंद्रग्रहण सकाळी ११.३४ मिनिटांनी लागणार असून संध्याकाळी ०५.३३ वाजता संपणार आहे. हे आंशिक चंद्रग्रहण असणार आहे, जे भारतासह युरोप आणि आशियातील बहुतांश भागात दिसणार आहे.

हिंदू पंचांगानुसार, वर्षातील हे दुसरे चंद्रग्रहण विक्रम संवत २०७८ मध्ये कार्तिक महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी वृषभ राशी आणि कृतिका नक्षत्रात लागणार आहे. तसेच हे ग्रहण भारतात सावलीच्या रूपात दिसेल, यामुळे या चंद्रग्रहणाचा सुतक कालावधी राहणार नाही. कारण या सुतक काळात स्वयंपाक करणे आणि पूजा करणे इत्यादी टाळले जाते. तसेच, ग्रहणाच्या वेळी देवाचे ध्यान केले जाते. या दरम्यान गर्भवती महिलांना अधिक सावधगिरी बाळगण्याचा सल्ले देखील दिले जातात. तथापि लोकांना या चंद्रग्रहणाबाबत अधिक काळजी घेण्याची गरज भासणार नाहीये.

या राशींवर होणार परिणाम

चंद्रग्रहण वृषभ आणि कृतिका नक्षत्रात लागणार आहे, त्यामुळे या ग्रहणामुळे प्रामुख्याने वृषभ, कन्या, वृश्चिक, धनु आणि मेष या पाच राशींवर परिणाम होणार आहे.

वृषभ राशीच्या लोकांना या काळात वादविवाद टाळावे लागतील. तसेच तुम्हाला तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल कारण या काळात आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. यामुळे ज्योतिष शास्त्रानुसार वृषभ राशीच्या लोकांना एकांतवासात देवाच्या नावाचा जप करण्याचा सल्ला देण्यात आलाय.

लोक चंद्रग्रहणाच्या वेळी राहू-केतूशी संबंधित मंत्रांचा जप करू शकतात. कारण असे मानले जाते की चंद्रग्रहण राहू-केतूमुळे लागतो. याशिवाय ग्रहणाच्या वेळी हनुमान चालीसा, दुर्गा चालीसा, विष्णु सहस्रनाम, श्रीमद भागवत गीता इत्यादी पठण करावे.

Story img Loader