Late Night Dinner : आपल्यापैकी अनेक जणांना रात्री उशिरा जेवण्याची सवय असते. अनेक लोक कामाला खूप प्राधान्य देतात आणि आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे अनेकदा जेवणाच्या वेळाही पाळल्या जात नाहीत. रात्री ८ नंतरचे जेवण आपल्या आरोग्यासाठी चांगले नसते. अनेक आरोग्य तज्ज्ञ सांगतात, की जेवण आणि झोप यांच्या वेळेमध्ये दोन तासांचे अंतर असावे. पण, तुम्हाला माहिती आहे का की, रात्री उशिरा जेवण्याने काय नुकसान होते; चला तर जाणून घेऊ या …

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

झोप

उशिरा जेवण करण्याची सवय ही थेट झोपेवर परिणाम करते. अनेक लोकांना रात्री लवकर झोप येत नाही. उशिरा जेवण केल्यामुळे नॅचरल सायकल बिघडते. रात्री झोपताना अस्वस्थता जाणवते आणि लवकर झोप येत नाही.

हेही वाचा : Proteins Food : श्रावणात नॉनव्हेज खाऊ शकत नाही? डाळीबरोबर खा ‘या’ तीन गोष्टी, चिकन-मटणपेक्षाही जास्त मिळेल प्रोटीन्स

पचनक्रिया

उशिरा जेवण केल्यानंतर जर तुम्ही लगेच बेडवर झोपायला जात असाल, तर त्याचा थेट परिणाम पचनक्रियेवर होतो. अशाने अॅसिडिटीसारख्या समस्या जाणवतात. जेवण केल्यानंतर शरीराची हालचाल करणे गरजेचे आहे; ज्यामुळे अन्न सहज पचणे शक्य होते.

वजनवाढ

हल्ली अनेक जण वजनवाढीच्या समस्येने त्रासलेले आहेत. जर तुम्ही उशिरा जेवण करत असाल, तर तुमचे वजन वाढू शकते. जेवण आणि झोप यांच्या वेळेत दोनतीन तासांचे अंतर ठेवावे.

हेही वाचा : ‘Eye Flu’ची तीव्रता कशी समजून घ्यावी आणि त्यानुसार कोणते औषध घ्यावे? वाचा, नेत्रतज्ज्ञ काय सांगतात…

रक्तदाबाच्या त्रासाचा धोका

उशिरा जेवण केल्यामुळे कोलेस्ट्रॉल, मधुमेह व रक्तदाब यांचा त्रास जाणवू शकतो. नियमित उशिरा जेवण केल्यामुळे तुमचे वजन वाढू शकते आणि रक्तातील साखरही अनियंत्रित होऊ शकते; ज्यामुळे हृदयाशी संबंधित आजार होण्याचा धोका वाढतो.

(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Late night dinner side effects on health healthy lifestyle ndj