Irregular Periods: मासिक पाळी प्रत्येक महिलेच्या आयुष्यातील महत्वाचा भाग आहे. दर महिन्यात येणाऱ्या पीरियड्सची तारीख चुकते तेव्हा स्त्रियांच्या मनात गर्भधारणेची पहिला विचार येतो. मात्र मासिक पाळी विलंब होण्याची अनेक कारणं आहेत. आजकाल बिझी लाइफस्टाईल आणि अनहेल्दी खाण्यामुळे आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. यामुळे अनेक महिला मासिक पाळी उशिरा येण्याच्या समस्येनेही त्रस्त आहेत. याकडे वेळीच लक्ष न दिल्यास भविष्यात याचा मोठा परिणाम होऊ शकतो. नेमकी काय आहेत कारण आणि यावर काय उपाय करु शकतो पाहुयात.
जास्त तणाव –
जर तुम्ही जास्त स्ट्रेस घेत असाल तर त्यामुळे तुमचे हार्मोन्स इन बॅलन्स होतात आणि त्यामुळे मासिक पाळी उशीरा येते. तणाव हा मासिक पाळी उशीरा येण्याचं प्रमुख कारण आहे.
आजारी असल्यास –
आपण जेव्हा आजारी असतो, तेव्हा आपल्या शरिरात ताकदीची कमतरता असते. त्यावेळीही मासिक पाळी उशीरा येण्याचं अडचणी येतात. काहीवेळा औषधांमुळेही शरिरावर परिणाम होतो.
लोहाची कमतरता अशक्तपणा –
शरीरासाठी लोह खूप महत्त्वाचं आहे. लोह शरीराला कमी पडलं तर अनेक आरोग्य समस्या निर्माण होतात. लोह हे शरीरासाठी अत्यंत महत्त्वाचे पोषक तत्व आहे. लोहाची कमतरता असल्यास माणसाला नेहमी थकवा जाणवतो. महिलांना अनेकदा अॅनिमियाचा त्रास होतो. विशेषतः गर्भधारणेदरम्यान शरीरात लोहाची कमतरता निर्माण झाल्यास ते गुंतागुतीचे होते.
शरीरात पाण्याची कमतरता –
शरीरात पाण्याचे प्रमाण कमी असल्यास शरीर डिहायड्रेट होण्याची शक्यता असते. जेव्हा तुम्ही दिवसभरात भरपूर पाणी पिता तेव्हा याने फ्री रॅडिक्लससोबत लढण्यास मदत मिळते. ज्याने त्वचा आणि अवयव चांगले राहतात. पण जेव्हा शरीरातील पाणी कमी होतं तेव्हा काही आजार वाढतात.
हेही वाचा – दुसऱ्याला जांभई देताना पाहून तुम्हालाही जांभई येते का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण
व्यायाम करणे –
सकाळी केलेल्या व्यायामुळे शरीरातील मेटाबॉलिझम रेट वाढतो, यासह अतिरिक्त चरबी कमी करण्यासही मदत होते. व्यायाम केल्यानं आपल्याला दिवसभर फ्रेश वाटतं. काळी लवकर रिकाम्या पोटी व्यायाम केल्यानं वजन कमी होते.
थायरॉइड –
भारतातील दर 10 व्यक्तींपैकी एका व्यक्तीला हा आजार झालेला आहे. हा आजार महिलांमध्ये अधिक प्रमाणात आढळतो. यामुळेही मासिक पाळी उशीरा येते.