भारतीय रेल्वेमध्ये विविध पदांसाठी भरती होत असते. याचं अधिकृत नोटिफिकेशन, माहिती ही भारतीय रेल्वे रिक्रुटमेंट सेल द्वारे नेहमी लोकांपर्यंत पोहचवली जाते. भारतीय रेल्वे रिक्रुटमेंट सेल, पश्चिम रेल्वेने स्पोर्ट्स कोट्याअंतर्गत ग्रुप सी मधील पदांवर भरतीची घोषणा केली आहे. इच्छुक उमेदवार ४ ऑगस्ट २०२१ पासून यासाठी अर्ज करू शकतात. अर्ज rrc-wr.com या वेबसाईटवर ऑनलाइन स्वरुपात करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३ सप्टेंबर २०२१ आहे त्यामुळे ३ सप्टेंबर किंवा त्या आधी उमेदवारांनी अर्ज करावा. या पदांसाठी अर्ज करतांना लागणारी शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया आणि पगाराविषयी जाणून घेऊयात.

किती मिळणार पगार?

रेल्वे रिक्रुटमेंट सेलद्वारे जाहीर केलेल्या नोटिफिकेशन नुसार मैट्रिक लेवल ४ च्या उमेदवारांना २५,५०० रुपयांपासून ८१,१०० रुपयांपर्यंत पगार मिळू शकतो. तर मैट्रिक लेवल ५ च्या उमेदवारांना २९,२०० रुपयांपासून ते ९२,३०० रुपयांपर्यंत पगार मिळू शकतो. मैट्रिक लेवल २ च्या उमेदवारांना १९,९०० रुपयांपासून ६३,२०० रुपयांपर्यंत तर मैट्रिक लेवल ३ च्या उमेदवारांना २१,७०० ते ६९,१०० रुपयांपर्यंत पगार मिळू शकतो.

लेवल ४ आणि ५ साठी कोण अर्ज करू शकेल?

लेवल ४ आणि ५ साठी उमेदवारांना अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी ऑलम्पिक खेळात (सिनीअर वर्ग) देशाचं प्रतिनिधित्व केलेलं असायला हवं. किंवा मग विश्व कप (जुनिअर, युवा, सिनिअर वर्ग) किंवा विश्व चॅम्पियनशिप (जुनिअर,सिनिअर श्रेणी) किंवा आशियाई खेळात (सिनिअर वर्ग) किंवा राष्ट्रमंडळ मध्ये कमीत कमी तिसरा स्थान प्राप्त केलेलं असावे. शैक्षणिक पात्रतेची अधिक आणि पूर्ण माहिती मिळवण्यासाठी वेबसाईटवरील अधिकृत नोटिफिकेशन नक्की पहा.

कशी होणार निवड?

यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची निवड ट्रायल, उपलब्ध खेळ, शैक्षणिक पात्रता आणि मुल्यांकनावर केली जाईल. ट्रायल मध्ये फिट असलेले, पास होणारे उमदेवारचं पुढच्या फेरीसाठी निवडले जातील. ३ सप्टेंबर किंवा त्या आधी ऑनलाइन स्वरुपात उमेदवारांनी अर्ज करावा. अधिकृत नोटिफिकेशन व्यवस्थित वाचूनचं अर्ज करावा.