आता हिवाळ्याचे दिवस संपून हळूहळू उन्हाळा जवळ यायला लागला आहे. अनेकांना उन्हाळा नकोसा वाटतो, कारण उन्हाळा म्हणजे प्रखर तापलेला सूर्य, उन्हामुळे येणारा घाम आणि त्यामुळे शरीराला नकोसा वाटणारा चिकटपणा यामुळे तो अनेकांना नकोसा वाटतो. तुम्ही AC किंवा कुलरमध्ये बसत असलात तरीही उन्हाच्या झळाशी तुम्हाला थोडा तरी सामना करावा लागतो. शिवाय या हवामानाचा थेट परिणाम आपल्या मूडवर होतो. वारंवार घाम येण्यामुळे किंवा सतत एसीचे तापमान सेट करताना आपली अनेकदा चिडचिड होते.
त्यामुळे अशा वेळी तुम्ही केवळ ताज्या आणि बाहेरच्या हवेवर अवलंबून न राहता तुमच्या आहारात अशा काही गोष्टींचा समावेश करा ज्यामुळे तुमचा मूड सुधारु शकतो. ते कसं हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला मूड आणि अन्न यामधील गणित समजून घ्यावे लागेल.
हेही वाचा- मोबाईल वापरण्याची पद्धत सांगू शकते तुमचं व्यक्तिमत्त्व? कसं ते जाणून घ्या
मूड आणि अन्न –
खराब मूड हे तुमच्या शरीरात सेरोटोनिन नावाच्या पदार्थाची कमतरता असल्याचे लक्षण आहे. हा एक प्रकारचा न्यूरोट्रांसमीटर आहे, जो मूड बदलणं थांबवतो. हे घटक तुमच्या शरीरात संतुलन स्थिर राहण्यासाठी अन्नपदार्थांमध्ये ट्रिप्टोफॅन नावाचे अमिनो आम्ल असणे आवश्यक आहे. ज्या पदार्थांमध्ये ट्रिप्टोफॅन चांगल्या प्रमाणात असते.ते खाल्ल्याने सेरोटोनिनचे उत्पादन वाढते आणि तुमचा मूडही चांगला राहतो. ज्यामुळे तुम्ही शांत आणि आनंदी राहू शकता.
मूड स्विंग टाळण्यासाठी काय खावे?
केळ –
हेही वाचा- ‘या’ पद्धतीने पाणी प्यायल्याने वाढतो डायबिटीज व कॅन्सरचा धोका? तज्ञांनी दिले स्पष्ट उत्तर
केळामध्ये ट्रिप्टोफॅन चांगल्या प्रमाणात असते. यामुळेच केळी खाल्ल्याने मूडही चांगला राहतो आणि झोपही चांगली येते.
बदाम –
बदामामध्ये फोलेट आणि मॅग्नेशियम असते. मॅग्नेशियम सेरोटोनिनचे उत्पादन देखील वाढवते. याशिवाय बदाम हा B2 आणि E चे चांगले स्त्रोत आहे, जे प्रत्येक ऋतूमध्ये तुमची रोगप्रतिकारशक्ती चांगली ठेवण्यास मदत करते.
अननस –
अननसात ट्रिप्टोफॅन असते. याशिवाय ब्रोमेलेन नावाचे प्रोटीन देखील असते. या वरील पदार्थांचे सेवन करताना तुमची कर्बोदके योग्य आणि नियंत्रित प्रमाणात घेणंही लक्षात ठेवायला हवं. यामुळे मूड स्विंग टाळणे जास्त सोपे होईल.
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे, अधिकच्या माहितीसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा)