व्यायाम करण्याचे अनेक फायदे आहेत. परंतु योग्य पद्धतीने व्यायाम करणे अधिक महत्त्वाचे आहे. जर असे केले नाही, तर शरीरासाठी ते फायदेशीर नाही तर नुकसानदायक ठरेल. यासाठी व्यायाम सुरु करण्याआधी काही गोष्टी माहित असणे अत्यंत आवश्यक आहे. आज आपण वर्कआऊटच्या दरम्यान पाणी पिणे कितपत योग्य आहे, वर्कआऊट केल्यानंतर किती वेळाने पाणी प्यावे, या गोष्टी जाणून घेऊया. या गोष्टीबद्दल जास्त बोलले जात नाही. पण व्यायाम करताना काही नियम पाळणे देखील आवश्यक आहे कारण त्यांचा थेट परिणाम आपल्या शरीरावर होतो.
वर्कआऊट करण्याआधी पाणी पिण्याची योग्य पद्धत
काही लोक व्यायाम सुरू करण्यापूर्वीच पाणी पितात, जेणेकरून व्यायाम करताना त्यांना पाण्याची गरज भासू नये. व्यायामासाठी शरीर हायड्रेटेड राहणे खूप महत्वाचे आहे, परंतु व्यायामापूर्वी लगेच पाणी पिल्याने आरोग्य बिघडू शकते. खरे तर व्यायामाच्या अर्धा तास आधी पाणी प्यावे. एकाच वेळी जास्त पाणी पिऊ नये. घसा ओला करण्यासाठी पुरेसे पाणी घेणे चांगले.
बिअरच्या बॉटल्स फक्त हिरव्या आणि तपकिरी रंगाच्याच का असतात? यामागे आहे वैज्ञानिक कारण
वर्कआऊट केल्यानंतर किती पाणी प्यावे
व्यायाम केल्यामुळे खूप घाम येतो आणि आपल्याला धाप लागते. यामुळेच घासदेखील कोरडा पडायला लागतो. व्यायाम केल्याने शरीर गरम होते. यामुळे तहान भागवण्यासाठी लोकं पाणी पितात. परंतु हे अत्यंत चुकीचे आहे. यामुळे आपल्या मांसपेशींना झटका बसू शकतो आणि छातीत दुखणे, पोटात दुखणे, उलटी येणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात. त्यामुळेच व्यायाम केल्यानंतर २० ते २५ मिनिटांनी पाणी प्यावे. कारण तोपर्यंत शरीराचे तापमान सामान्य झालेले असते.
पाणी पिण्याचा हा नियम कार्डिओपासून पिलेट्स, योगासने, धावणे, किक-बॉक्सिंग, वेट ट्रेनिंग या सर्व प्रकारच्या व्यायामांना लागू आहे.