आलं आणि लसूण हे दोन्ही पदार्थ रोजच्या जेवणातील मुख्य घटक आहेत. जेवण चवदार बनवण्यासाठी आलं आणि लसूण पेस्ट यांची महत्त्वाची भूमिका असते. बरेच लोक घरात आलं आणि लसूण पेस्ट बनवून ठेवतात. रोजची भाजी बनवायला घेतली की आलं लसणाची पेस्ट तयार असेल तर काम वाचतं आणि वेळही वाचतो. अनेकदा घरात तयार केलेली आलं लसणाची पेस्ट फ्रिजमध्ये साठवून ठेवली की दोन दिवसांनी काळपटपणा येतो, खराब झाली असावी असं वाटतं. फ्रीजशिवाय जास्त काळ आलं आणि लसूण पेस्ट कशी साठवायची, यावर तुम्हाला उपाय सांगणार आहोत. जेणेकरून, ही पेस्ट रेफ्रिजरेटरशिवायही जास्त काळापर्यंत टिकवून ठेवता येईल.
आलं आणि लसूण यांची एकत्र पेस्ट बनवण्यासाठी प्रमाणाची काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे. यामध्ये ६० टक्के लसूण पेस्ट, तर ४० टक्के आल्याची पेस्ट घेऊन चांगले मिसळा. आल्याची चव तीव्र असल्यानं आल्याची पेस्ट कमी घेतली जाते.
लसूण-आले पेस्ट अशा प्रकारे साठवा
प्रथम आले सोलून त्याचे जाड तुकडे करा. आता लसूण सोलून कळ्या काढा. तुम्हाला हवे असल्यास आले आणि लसूण समान प्रमाणात घेऊ शकता किंवा लसूण थोडे जास्त ठेवू शकता. आता मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या. आता ही पेस्ट चमच्याच्या मदतीने बर्फाच्या ट्रेमध्ये ठेवा. बर्फाच्या ट्रेला प्लास्टिकच्या आवरणाने गुंडाळा आणि १२ तास रेफ्रिजरेटरमध्ये ठेवा.
आणखी वाचा : Yoga For Winters: हिवाळ्यात करा हे ५ योगासने; आरोग्यासाठी ठरतील अतिशय फायदेशीर!
आले लसूण पेस्ट गोठल्यावर बर्फाचा तुकडा काढा आणि एका मोठ्या प्लास्टिकच्या पिशवीत पॅक करा आणि झिप लावा. आता जेव्हा जेव्हा तुम्हाला आले-लसूण पेस्ट वापरायची असेल तेव्हा तुमच्या गरजेनुसार दोन चौकोनी तुकडे काढा.
जर तुम्हाला सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ चालवायचे असेल तर आले आणि लसूण पेस्ट एअर टाईट डब्यात ठेवा आणि वर ३ ते ४ चमचे व्हिनेगर घाला. यामुळे आले आणि लसूण पेस्टचा रंग किंचित बदलेल, परंतु तुम्ही ते जास्त काळ ताजे ठेवू शकता. आता जेव्हाही वापरायचं असेल तेव्हा व्हिनेगरच्या खालील पेस्ट वापरत रहा. शेवटी वरचा भाग व्हिनेगरसह वापरा.
अशा प्रकारे तुम्ही आले-लसूण पेस्ट सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ साठवून ठेवू शकता.