आजकाल बाजारात घरात वापरले जाणारे सगळेच पदार्थ हे भेसळ केलेले आढळतात. कोणतीही वस्तु पदार्थ हे पुर्णपणे शुद्ध असलेली आढळत नाही. तसेच कोणत्या पदार्थांमध्ये किती भेसळ केलेली आहे हे आपल्या माहीत नसते. तसेच बाजारात कोणतीही भेसळ सहजपणे सापडत नाही, म्हणून भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI) ने सोशल मीडियावर व्हिडीओद्वारे लोकांना जागरूक केले आहे. व्हिडीओमध्ये FSSAI द्वारे काही सोप्या ट्रिक्स सांगितल्या आहेत, ज्याद्वारे तुम्ही कोणत्याही भेसळयुक्त गोष्टी अचूक पद्धतीने ओळखू शकाल. एफएसएसएआयने(FSSAI) एक नवीन व्हिडीओमध्ये पोस्ट केली आहे. ज्यात तुम्हाला काळी मिरीची भेसळ ओळखता येईल. यानंतर तुम्ही योग्य भेसळ न केलेली काळीमिरी बाजारातून खरेदी करू शकता.
काळी मिरी कशी ओळखावी
भेसळ करणारे अनेकदा काळी मिरीच्या दाण्यांमध्ये काही काळे बिया टाकतात. FSSAI च्या मते, काळी मिरीची क्वालिटी चेक करण्यासाठी एक छोटी चाचणी पुरेशी असल्याच सांगितलं आहे. याकरिता टेबलावर थोडी काळी मिरी ठेवा. आता त्यांना आपल्या हातांनी दाबण्याचा प्रयत्न करा. काळी मिरी जी पूर्णपणे शुद्ध आहे ती सहज मोडणार नाही. तर भेसळयुक्त काळी मिरी सहज मोडेल. भेसळ करणारे अनेकदा काळी मिरी मध्ये हलके काळ्या रंगाचे बेरी मिसळून विकतात आणि आपल्या आरोग्याशी खेळतात.
या गोष्टींमध्येही होते भेसळ
काळी मिरी प्रमाणे देखील लाल मिरची पावडरमध्ये भेसळ केलेली असते. यात विटांचा बारीक चुरा, स्लेक्ड पावडर, साबण किंवा वाळू टाकून भेसळ लालमिरची पावडर बाजारात सहज विकली जाते. FSSAI ने ते ओळखण्याचा एक मार्ग सांगितला होता. यासाठी अर्धा ग्लास पाणी घ्या. त्यात एक चमचा लाल मिरची पावडर टाका. आता चमच्याने ग्लासच्या तळपर्यंत लाल मिरची पावडर ढवळा. यानंतर ही मिरची पावडर हातावर घेऊन चोळा. चोळयानंतर जर तुमच्या हातावर खडबडीत लागत असेल तर यात विटांचा चुरा मिक्स केलेला आहे. हे समजून घ्या. तसेच जर हाताला चमदारपणा जाणवत असेल तर समजून घ्या की त्यात साबण पावडर वापरली गेली आहे.
त्याचप्रमाणे, आपण हळदीच्या गुणवत्तेची चाचणी देखील घेऊ शकता. यासाठी काचेचा ग्लास अर्ध्या पाण्याने भरून घ्या. त्यानंतर त्यात एक चमचा हळद टाका. जर हळद पूर्णपणे ग्लासच्या तळाशी स्थिरावली आणि पाण्याचा रंग हलका पिवळा झाला तर त्यात कोणतीही भेसळ नाही. पण दुसरीकडे जर हळद पूर्णपणे स्थिरावली नाही आणि पाण्याचा रंगही खूप पिवळा झाला,तर त्या हळदीत भेसळ झाल्याचे समजते.