Learning Tips For Students : मुलांच्या चांगल्या भविष्यासाठी सर्व पालकांना वाटते की, त्यांच्या मुलांनाी चांगला अभ्यास करावा आमि आयुष्यात खूप प्रगती करावी. काही मुलं अत्यंत हुशार आणि बुद्धिवान असतात जे कोणतेही गोष्ट सहज लक्षात ठेवतात. तर काही मुलं अभ्यास करूनही सर्व विसरतात. जर मुलांची स्मरणशक्ती कमी असेल तर ते अभ्यास केलेल्या, लक्षात ठेवलेल्या गोष्टी विसरून जातात. काळजी करू नका, आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोते त्यामुळे मुलांना केलेला अभ्यास लक्षात राहील आणि त्यांची स्मरणशक्त चांगली होईल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुलांना वाचण्यासाठी फॉलो करा टिप्स

अभ्यासाचा आनंद घ्यायला शिकवा
अभ्यास करताना मुलांना काही रंजक टिप्ससह शिकले पाहिजे. त्यामुळे मुलांना सर्व गोष्टी व्यवस्थित लक्षात राहतात. कोणत्याही विषयावर कुतूहलाने अभ्यास केल्याने त्यांना मज्जा येईल.

हेही वाचा – National Nutrition Week 2023 : आहारातील सूक्ष्म पोषक तत्वांचे महत्त्व समजून घ्या 

जास्त अभ्यास करू नका
चांगले गुण मिळवण्यासाठी पालक मुलांकडून खूप अभ्यास करायला सांगतात. पण जास्त वेळ आणि सतत अभ्यास केल्याने डोक्यावर ताण येतो. अभ्यासदरम्यान, थोड्या थोड्या वेळाने साधारण १ तासाने ब्रेक घेतला पाहिजे. मध्ये मध्ये ५-१० मिनिंटे फ्रेश होऊन पून्हा अभ्यास सुरू करा. असे केल्याने सहज सर्व लक्षात राहील.

नुसते पाठांत्तर करणे टाळा
अभ्यास करताना कोणताही विषय समजला नाही तर ते वारंवार पाठांत्तर करतात त्यामुळे भलेही त्यांना ते भलेही सर्व लक्षात असेल पण त्याबाबत मनाने ते काही लिहू शकत नाहीय त्यामुळे पाठंतर करू नये आणि मुलांना अवघड विषय समजावून सांगा आणि मग लक्षात ठेवायला सांगा.

हेही वाचा – काजूमध्ये असतात शुन्य कोलेस्ट्रॉल! ह्रदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकही टाळू शकतो, डॉक्टरांकडून जाणून घ्या

उजळणी नक्की करा
अभ्यासानंतर उजळणी करणे फार महत्वाचे आहे. कोणताही विषय नीट शिकवल्यानंतर मुलांना उजळणी करायला लावा. लक्षात ठेवल्यानंतर उजळणी केली तर सर्व काही दीर्घकाळ लक्षात राहते.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Learning tips parenting tips for child memory sharp learning tips for students follow these tips to long last learning snk