Stale Rice Under Microscope: अनुभवी गृहिणी सुद्धा काही वेळा एका गोष्टीत नक्की चुकू शकतात आणि ती म्हणजे किती पेल्याचा भात लावायचा. काही वेळा घरात अचानकच सगळ्यांना भात खावासा वाटतो तर काही वेळा भरपूर भात असूनही सगळे पोळ्याच खाण्यास निवडतात. आधीच्या परिस्थितीत पेलाभर भात अधिकचा लावणे सोपे असते पण भात जास्त झाल्यास त्याचं काय करायचं हा प्रश्न मोठा असतो. आपल्या घरात अशी काही स्थिती आलीच तर अन्नाचा अपमान कशाला म्हणून आपणही भात स्टोअर करून ठेवतो आणि मग दुसऱ्या दिवशी परतून फोडणी देऊन इंडियन फ्राईड राईस म्हणून खातो. यात तुम्ही एकावेळच्या भाताचे पैसे जरी वाचवत असाल तरी यामुळे एक दोन दिवसातच आरोग्याचे तीन तेरा वाजण्याची पूर्ण शक्यता असते. विश्वास बसत नसेल तर हा व्हिडीओ नक्की पाहा.
वेगवेगळ्या वस्तू मायक्रोस्कोप खाली धरून त्याचा अभ्यास करणाऱ्या एका चॅनेलने अलीकडेच शिळ्या भाताचे परीक्षण केले. फ्रीजमध्ये ठेवलेला शिळ्या भाताचा कण काचेवर घेऊन त्यावर एक थेंब पाणी टाकून या व्यक्तीने मायक्रोस्कोप खाली धरला होता. यानंतर काहीच सेकंदात या भातातील वेगवेगळे जंतू स्क्रीनवर दिसू लागतात. यावरूनच तुम्ही अंदाज लावू शकता की हे जंतू भाताच्या रूपात जेव्हा आपल्या पोटात जात असतील तेव्हा शरीराचे किती नुकसान होत असेल.
Video: शिळ्या भाताचं काय झालं पाहा…
हे ही वाचा<< घरगुती तेल व खोबरेल तेलातील भेसळ ओळखण्याची सोपी पद्धत; पावसाळ्यात आजार टाळायचे असतील तर बघाच
दरम्यान, आजवर अनेक तज्ज्ञांनी वेळोवेळी हा सल्ला दिला आहे की शक्य झाल्यास गरम व ताजे अन्न खाण्याचा प्रयत्न करावा. पावसाळ्यात तर हा मुख्य नियम बनवून घेतला तरी चालेल. पण समजा एखाद्या वेळेस भात जास्त झालाच आणि फेकून देणं हा पर्याय नसल्यास आपण भात फ्रीजमध्ये ठेवण्याऐवजी किचनमध्ये बाहेरच झाकून ठेवू शकता.