भारतीय आयुर्विमा महामंडळ लोकांसाठी अनेक योजना आणते. लोकांना विम्यासोबतच पैसे जमा करण्याची संधी दिली जाते. यासोबतच एलआयसीची पॉलिसी तुम्हाला संरक्षण देते. एलआयसीची अशीच एक पॉलिसी म्हणजे जीवन उमंग योजना सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. या योजनेत गुंतवणूक करून मोठा नफा मिळू शकतो. या योजनेतील हिशोबाच्या आधारे, तुम्ही दरमहा १३०० रुपयांची बचत करून २८ लाख रुपयांपर्यंत रक्कम मिळवू शकता. या योजनेबद्दल जाणून घेऊयात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कोणत्याही भारतीय नागरिकाला ही पॉलिसी घेता येते. वय ९० दिवस ते ५५ वर्षे या दरम्यान असलं पाहीजे. ही एक एंडोमेंट योजना आहे, ज्यामध्ये लाइफ कव्हरसह मॅच्योरिटीवर एकरकमी रक्कम दिली जाते. या योजनेत, जर मॅच्योरिटी पूर्ण झाली, तर निश्चित उत्पन्न दरवर्षी तुमच्या खात्यात जमा होत राहते. मात्र पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास, त्याच्या नॉमिनीला एकरकमी रक्कम दिली जाते. या योजनेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ते १०० वर्षांपर्यंतचे कव्हरेज प्रदान करते. या पॉलिसी अंतर्गत, गुंतवणुकदाराचा अपघाती मृत्यू झाल्यास किंवा अपंग झाल्यास टर्म रायडरचा लाभ दिला जातो. बाजारातील जोखमीचा या योजनेवर कोणताही परिणाम होत नाही. या पॉलिसीवर एलआयसीच्या नफा-तोट्याचा निश्चितच प्रभाव आहे. आयकर कलम ८० सी अंतर्गत या पॉलिसीमध्ये कर सूट देखील देण्यात आली आहे. या योजनेंतर्गत जर कोणी पॉलिसी घेतली तर त्याला किमान दोन लाखांचा विमा घ्यावा लागेल.

Astrology: ३० डिसेंबरला शुक्र करणार गुरूच्या राशीत प्रवेश; २०२२ या वर्षात ४ राशींना मिळणार नशिबाची साथ

या पॉलिसीमध्ये कोणत्याही व्यक्तीने १३०२ रुपये प्रीमियम भरल्यास एका वर्षात ही रक्कम १५,२९८ रुपये होते. या योजनेत ३० वर्षांसाठी गुंतवणूक केली तर ही रक्कम सुमारे ४.५८ लाख रुपये होते. यानंतर ३१ व्या वर्षापासून कंपनी दरवर्षी ४० हजारांचे रिटर्न देण्यास सुरुवात करते. त्यानुसार, जर कोणी हा परतावा १०० वर्षांसाठी घेत असेल तर १०० व्या वर्षी त्याला २७.६० लाख रुपये मिळतील.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lic jeevan umang policy investment 1302 per month earn more than 27 lakh rmt