Summer Skin Care Tips : एप्रिल आणि मे महिना म्हणजे अजिबात नको होणारा कालावधी. उन्हाचा कडाका वाढल्याने शरीराची लाहीलाही, त्यामुळे प्रमाणाबाहेर येणारा घाम आणि होणारी चिकचिक नको होते. त्यातही घशाला आणि तोंडाला सतत कोरड पडत असल्याने सारखं पाणी प्यावसं वाटतं. उन्हाळ्याच्या दिवसांत उष्णता होणे, उन्हाळी लागणे, चक्कर येणे किंवा डिहायड्रेशन अशा समस्या निर्माण होतात. कितीही घराबाहेर पडायचं नाही असं ठरवलं तरी काहीना काही कामासाठी बाहेर पडावंच लागतं. त्यात लोकसभा निवडणुका सुरु आहेत त्यामुळे मतदान करण्यासाठी तर प्रत्येक नागरीकाला मतदान केंद्रावर जाणं अनिवार्य आहे. अशातच भर उन्हात आपल्या त्वचेची काळजी कशी घ्यायची हे आजच्या लेखात समजून घेऊयात.

स्कार्फ किंवा टोपी

yugendra pawar slams ajit pawar ncp for not opposing gopichand paradkar over his remarks on sharad pawar
पडळकरांच्या टीकेला विरोध करायला हवा होता;  युतीतील राष्ट्रवादीकडून युगेंद्र पवारांची अपेक्षा
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Ajit pawar maratha leader rising in Delhi
Ajit Pawar: अजित पवार दिल्लीतील नवे मराठा स्ट्राँगमॅन; खासदार सुनेत्रा पवार यांना शरद पवारांसमोरील बंगला मिळाल्यामुळे चर्चांना उधाण
curd and coffee for tan removal
Tan Removal Remedy : चमकदार त्वचेसाठी घरच्या घरी करा उपाय! दही व कॉफीचा लावा मास्क; पण डॉक्टरांचे मत काय?
Independent MLA Sharad Sonawane.
MLA Sharad Sonawane : अपक्ष आमदाराची महायुतीकडे मंत्रिपदाची मागणी, विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसत झळकावला फलक
Vanchit Bahujan Aaghadi Maharashtra Assembly Election Results 2024
वंचितही ईव्हीएमविरोधात आक्रमक, थेट निवडणूक आयोगाला पत्र; विचारले ‘हे’ तीन प्रश्न
Sharad Pawar asserts that distrust in the electoral system should be removed print politics news
मारकडवाडीवरून कलगीतुरा, निवडणूक यंत्रणेबद्दल अविश्वास दूर करा; शरद पवारांचे मारकरवाडीत प्रतिपादन
Moong dal health benefits
दररोज भिजवलेले मूग खाणं आरोग्यासाठी घातक? मग तज्ज्ञ काय सांगतात…

महिलांनी घराबाहेर जाताना डोक्याला आणि चेहऱ्याला स्कार्फ आवर्जून बांधायला हवा. या स्कार्फमुळे कडक उन्हापासून आपल्या डोक्याचे संरक्षण होते. इतकेच नाही तर उन्हाच्या चटक्यामुळे काळी पडणारी स्कीन आणि केस यांचेही संरक्षण होते. त्यामुळे उन्हात बाहेर पडताना कॉटनची ओढणी किंवा दुपट्टा घ्यायला अजिबात विसरु नका. इतकेच नाही तर तुम्ही गाडीवर किंवा चालत फिरणार असाल तर गॉगल लावायला विसरु नका, त्यामुळे तुमच्या डोळ्यांचे संरक्षण व्हायला मदत होईल.

सन स्क्रीन लोशन

उन्हाळ्याच्या दिवसांत सूर्यकिरणे तीव्र असतात. ही किरणे अंगावर पडली की त्यामुळे सन बर्न किंवा त्वचेला रॅश येणे, खाज येणे अशा समस्या उद्भवतात. अशावेळी आपण घरातून बाहेर पडताना हाताला, मान आणि चेहऱ्याला आवर्जून सनस्क्रीन लोशन लावतो. मात्र काही वेळाने याचा इफेक्ट कमी होत जातो. अशावेळी पुन्हा सनस्क्रीन लोशन लावण्याची आवश्यकता असते. त्यामुळे आपल्याला बाहेर वेळ लागणार असेल तर आपल्या बॅगेत सनस्क्रीन लोशन आवर्जून असायला हवे.

सुती आणि आरामदायक कपडे घाला

उन्हाळ्यात नेहमी सुती आणि आरामदायी कपडे घालावेत. कारण, इतर कापडांमुळे तुम्हाला खूप लवकर उष्णता जाणवायला लागेल आणि तुम्ही दिवसभर अस्वस्थ राहाल.

हेही वाचा >> Skin Care : स्क्रबिंग किती वेळ करावं हेसुद्धा माहिती असणं गरजेचं? नाहीतर चेहरा…

मुलतानी माती

गरमीच्या दिवसांमध्ये चेहऱ्याला दिवसातून एकदा तरी मुलतानी मातीचा लेप लावावा. यामुळे चेहऱ्यावरील मुरूम कमी होण्यास मदत होईल तसचं त्वचा देखील उजळेल.मुलतानी माती अतिशय थंड असते. त्यामुळे चेहऱ्यावरील रेडनेस आणि आग कमी करण्यासाठी ती उपयोगी ठरते. तसचं मुलतानी मातीच्या फेसपॅकमुळे चेहऱ्यावर ग्लो टिकून राहतो.

Story img Loader