रिकाम्या पोटी खजूर खाण्याचे अनेक फायदे आहेत. इतकंच नाही तर ते रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतं आणि पचनशक्ती देखील वाढवते. हृदय निरोगी ठेवण्यासोबतच खजूर हार्मोन्सचे संतुलन राखण्यासही मदत करतात. जर तुम्हाला ताकद हवी असेल तर तुपात भिजवलेले खजूर रोज रिकाम्या पोटी खा. खजूर आणि तूप हिवाळ्यात तुम्ही रोज खाऊ शकता.
तुपात भिजवलेले खजूर रोज रिकाम्या पोटी खाल्ल्यानं आरोग्याशी संबंधित सर्व प्रकारच्या समस्यांपासून आराम मिळवू शकता. तुपात भिजवलेले खजूर खाल्ल्याने आरोग्याशी संबंधित सर्व प्रकारच्या समस्यांपासून सुटका मिळते. अलिकडच्या वर्षांत त्याची लोकप्रियता वाढली आहे. चला जाणून घेऊया तुपात भिजवून खजूर खाण्याचे काय फायदे आहेत.
रोगप्रतिकार शक्ती मजबूत करते
तुपात भिजवलेले खजूर तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत होते. खजूरमध्ये भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडंट्स आणि जीवनसत्त्वे असतात, त्यात विटॅमिन ए आणि सी समाविष्ट असतात, जे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत करतात. यामध्ये बॅक्टेरियाविरोधी गुणधर्म असतात.
पचनासाठी चांगले आहे
खजूर आणि तूप एकत्र खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते. खजूर हे आहारातील फायबरचा एक चांगला स्रोत आहे, जे आतड्यांसंबंधी तक्रारी दूर करण्यास मदत करते आणि तुमची पचन क्रिया निरोगी ठेवते. दुसरीकडे, तुपामध्ये ब्युटीरिक ऍसिड असते, जे आतड्यांचे संतुलन राखण्यास मदत करते. तुपात भिजवलेल्या खजूरांचे सेवन केल्याने पचन सुधारण्यास, बद्धकोष्ठता दूर होण्यास आणि सूज कमी होण्यास मदत होते.
हृदयाच्या आरोग्य सुधारते
खजूर आणि तूप एकत्र खाल्ल्याने हृदयाचे आरोग्य सुधारते. खजूरमध्ये पोटॅशियम आणि मॅग्नेशियम असते, जे रक्तदाब आणि हृदयविकाराचा धोका कमी करण्यास मदत करते. तूप हेल्दी फॅट्समध्ये समृद्ध आहे जे खराब कोलेस्टेरॉलची पातळी कमी करू शकते आणि शरीरात चांगले कोलेस्टेरॉल वाढवू शकते.
हार्मोन्सचं असंतुलन नियंत्रित करते
तुपात भिजवलेले खजूर हे पुरुष आणि स्त्रिया दोघांमध्ये हार्मोनल असंतुलन नियंत्रित करण्यासाठी मदत करते. खजूरमधील जीवनसत्त्वे आणि खनिजे यांचे उच्च प्रमाण हार्मोन्सचे संतुलन राखण्यास मदत करते, तर तूप शरीरात हार्मोन्सचे प्रमाण वाढवण्यास मदत करते. विशेषतः मासिक पाळीच्या अनियमितेमध्ये स्त्रियांसाठी उपयुक्त आहे.
दिवसभर उत्साह वाढवण्यास मदत
खजूर आणि तूप एकत्र खाल्ल्याने दिवसभर उत्साह वाढवण्यास मदत होते. या जादुई मिश्रणाचे सेवन केल्याने रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यास मदत होते. ज्यामुळे आपण दिवसभर उत्साही आणि फ्रेश राहू शकतो.
तुपात भिजवलेले खजूर कसे बनवायचे?
तुपात भिजवलेले खजूर तयार करणे सोपे आहे आणि ते घरीही सहज बनवता येते. चला याची रेसिपी पाहुयात.
- तूप आणि खजूर अशा प्रकारे बनवा.
- १०-१२ बिया नसलेले खजूर, २ चमचे तूप
- बिया नसलेल्या खजूर सुमारे ३० मिनिटे पाण्यात भिजवा.
- पाण्यातून खजूर काढा आणि वाळवा.
- मंद आचेवर पॅन गरम करून त्यात २ चमचे तूप घाला.
- तूप वितळल्यावर कढईत खजूर घाला.
- खजूर प्रत्येक बाजूला सुमारे २-३ मिनिटे किंवा ते सोनेरी तपकिरी होईपर्यंत शिजू द्या. थंड होऊ द्या.
- थंड झाल्यावर खजूर तुपात भिजवून हवाबंद डब्यात ठेवा. दररोज १-२ तुकडे खाऊ शकता.
हेही वाचा >> Skin care tips: चेहऱ्यावर लावा ‘या’ फळांच्या साली; काही दिवसातच चमकदार दिसेल चेहरा
जर तुम्हाला काही आरोग्यविषयक समस्या असतील तर तुपात भिजवलेल्या खजूरांचे सेवन करण्यापूर्वी आरोग्य तज्ञांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.