सध्याचा जमाना हा डिजिटल आहे. त्यामुळे आपण काय करतो, कुठे फिरतो याची प्रत्येक अपडेट क्षणाक्षणाला लोकांना सोशल मीडियाद्वारे देत असतो. मात्र, असे अनेक जण असतात ते या सोशल मीडियापासून लांब असतात, तरीदेखील त्या व्यक्तींबद्दल आपल्या मनामध्ये एक वेगळं स्थान असतं. त्यांच्या कोणत्या तरी गोष्टीवर आपण इंप्रेस्ड झालेलो असतो. अशा अनेक व्यक्ती आपल्या आयुष्यात आपणला भेटतात.
शिवाय ज्यांच्यामध्ये इतरांपेक्षा काहीतरी वेगळेपणा असतो अशा व्यक्तींचा स्मार्टनेस लगेच जाणवतो, त्या लोकांना भेटल्यावर इतरांनी आपणाला देखील स्मार्ट समजावं असं आपणाला वाटायला लागतं. पण तुम्हाला माहिती आहे का? मुळात आपण सर्वजण स्मार्ट असतोच पण आपल्यात कमी असते ती आत्मविश्वासाची, आत्मविश्वासाने वावरणारी प्रत्येक व्यक्ती हुशार दिसते, त्यामुळे तो आपला आत्मविश्वास वाढवण्यासाठी, आपण देखील स्मार्ट होण्यासाठी काय करावं लागेल, याबाबतच्या काही टिप्स तुम्हाला देणार आहोत. जाणून घेऊयात स्मार्ट लोकांच्या पाच स्मार्ट सवयी.
हेही वाचा- कमी वयात दाढी पांढरी होण्यामागे ‘ही’ आहेत कारणे, जाणून घ्या उपाय
शिकण्याची इच्छा –
हुशार व्यक्ती स्वत:ला कधीही परिपुर्ण समजत नाहीत. ते नेहमी इतरांकडून काहीतरी नवीन शिकण्याची तयारी ठेवतात. तसंच या लोकांना स्वत:चा मोठेपणा करायला आवडत नाही. त्यांच लक्ष केवळ स्वत:चं ज्ञान वाढवण्याकडे असतं.
गोष्टीच्या मुळापर्यंत जाणे –
आपणाला जे लोकं स्मार्ट वाटतात ते कधीच कोणत्याही गोष्टीची अर्धवट माहिती ठेवत नाहीत. त्यांना जी गोष्ट मनापासून आवडते. त्या गोष्टीची परिपुर्ण माहीती मिळवण्याचा ते प्रयत्न करतात. त्यामध्ये एखादं गाणं, सिनेमा किंवा पुस्तक असेल त्याबाबतची सर्व माहीती ते जमा करतात.
वास्तवात जगणं –
हेही वाचा- Jaggery Tea: गुळाचा चहा पिणं आरोग्यासाठी ठरु शकतं हानिकारक; कसं ते जाणून घ्या
ही लोकं कधीच काल्पनिक दुनियेत रमत नाहीत. त्यांना सोशल मीडियावरील व्यक्तिमत्व सुधारणाऱ्या जाहीराती आकर्षित करत नाहीत. कारण, सोशल मीडियावरच्या गोष्टी म्हणजे वेळ वाया घालवणं असं त्यांना वाटतं. त्याऐवजी ही लोकं वृत्तपत्र, पुस्तकांचे वाचन करणं, चित्र काढणं अशा गोष्टींमध्ये मन रमवतात. शिवाय वाचनामुळे ज्ञानात भर पडते आणि वास्तवाचे भान होते. त्यामुळे हे लोकं नको त्या गोष्टींमध्ये अडकत नाहीत.
चूक मान्य करणे –
चूका मान्य तेच लोक करतात, ज्यांना चूक आणि बरोबर या दोन्हीमधला फरक माहिती असतो. आपली चूक इतरांवर ढकलणारे कधीच स्मार्ट होऊ शकत नाहीत. शिवाय स्मार्ट लोकं स्वत:ला बरोबर ठरवण्यासाठी इतरांना दोष देत नाहीत. त्यामुळे तुम्हाला जर तुमच्या ग्रुपमध्ये, क्लासमध्ये किंवा ऑफिसमध्ये स्मार्ट बनायचं असेल तर तुमच्याकडून झालेल्या चूका मान्य करायला शिका.
उत्तम पर्याय शोधने –
स्मार्ट लोकांना एखादं काम करायचं असेल तर ते काम अशा पद्धतीने करतात की, त्याच्या कामातून त्यांचा स्मार्टनेस जाणवतो. त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीमुळे ऑफिसमध्ये देखील अनेक लोकं त्यांच्यावर इंप्रेस्ड होतात. शिवाय काम करताना एखादी अडचण आली तर कारणं न देता त्या अडचणीवर मात कशी करता येईल, यासाठी ते उत्तम पर्याय शोधून काढतात. वर सांगिंतलेल्या पाच सवयींपैकी तुमच्याकडे किती आहेत ते जाणून घ्या, जर नसतील तर आताच त्या सवयी स्वत:ला लावून घ्या.