आपल्या देशातील लोकं कोणतीही वस्तू पूर्ण वापरतात आणि मगच ती फेकून देतात. शिवाय एक उत्तम गृहीणी देखील घरात विकत आणलेली प्रत्येक वस्तू वाया न घालवता तीचा पुरेपुर वापर करते. मग त्यामध्ये टूथपेस्ट, शॅम्पू, साबण अशा विविध गोष्टींचा समावेश असतो. पण अशीच एक प्रत्येक घरात वापरली जाणारी वस्तू आहे, जिचा वापर आपण पुरेपूर करत नाही.

तुम्हाला प्रश्न पडला असेल की ती वस्तू कोणती, तर ती वस्तू आहे कपडे धुण्यासाठी वापरण्यात येणारी डिटर्जंट पावडर. या पावडरचा वापर आपण कपडे भिजवण्यासाठी करतो आणि पुन्हा ते पाणी फेकून देतो. पण आपण फेकून देत असलेल्या पाण्याचा वापर किती ठिकाणी करु शकतो हे जाणून घेतलं तर कपडे भिजवल्यानंतर उरलेलं पाणी तुम्ही कधीच फेकून देणार नाही. चला तर मग जाणून घेऊयात या उरलेल्या पाण्याचा वापर कशासाठी करायचा ते.

Water supply to Ulhasnagar Ambernath Badlapur closed for 24 hours
बारवीच्या जांभूळ जलशुद्धीकरण केंद्रात दुरूस्ती; उल्हासनगरसह अंबरनाथ, बदलापुरातील पाणी पुरवठा २४ तास बंद
walmik karad illegal transportation
वाल्मीक कराड: राखेच्या अवैध वाहतुकीतून दहशतीचा धुरळा!
Water supply to Kalyan Dombivli cities to be cut off for 18 hours on Thursday
कल्याण-डोंबिवली शहरांचा पाणी पुरवठा गुरुवारी अठरा तास बंद
Thane district water, MIDC, MIDC water scheme ,
ठाणे जिल्ह्याचे पाणी महागणार ? एमआयडीसीची पाणी योजना तोट्यात, दर वाढवण्याच्या हालचाली
Vasai Virar Municipal corporaton , Water Supply Vasai Virar, Water Team Vasai Virar ,
वसई : पालिकेचे पाणी पथक स्थापन, आमदारांनी खडसावताच पालिका सक्रिय
Increasing the height of Almatti Dam poses a flood risk to western Maharashtra
अलमट्टी धरणाची उंची वाढवल्याने पश्चिम महाराष्ट्राला पुराचा धोका?
big step by pune municipality to solve water problem in included villages
समाविष्ट गावातीत पाणी प्रश्न सोडवण्यासाठी पालिकेचे मोठे पाऊल !
almatti dam flood
कर्नाटकच्या कृष्णाकाठ योजनेमुळे पश्चिम महाराष्ट्राला महापुराचा धोका

आणखी वाचा- खराब कोलेस्ट्रॉल लघवीद्वारे सहज काढून टाकतील ‘या’ तीन भाज्या, जाणून घ्या कसे

फरशी पुसायला –

डिटर्जंट पावडरच्या उरलेल्या पाण्याचा वापर आपण फरशी पुसण्याठी करु शकतो. हे पाणी फरशीवर टाकून फरशी थोडी घासली की फरशी चमकू लागेल, शिवाय फरशीवर साचलेली घाण देखील साफ होईल.

झाडांसाठी –

उरलेले डिटर्जंटच्या पाण्यापासून आपण बागेतील झाडांची सुरक्षा करु शकतो. कपडे भिजवून उरललेल्या या डिटर्जंट पावडरच्या पाण्यामध्ये लिंबाचा रस मिसळून जर त्याचा फवारा झाडांवर केला तर ते पाणी एखाद्या किटकनाशकाप्रमाणे काम करते आणि झाडाला किड लागण्यापासून वाचवते.

कीटकांना ठेवते दूर –

बाथरूममध्ये किटक येणं ही सामान्य बाब आहे. शिवाय या किटकांमुळे आपण त्रस्त देखील झालेलो असतो. हे किटक घालवण्यासाठी आपण अनेक उपाय करतो. पण तेच जर डिटर्जंट पावडरच्या पाण्यात बेकिंग सोडा मिसळून ते पाणी जर बाथरुममधील पाईपमध्ये ओतले तर किटकांच्या समस्येपासून सुटका होईल.

आणखी पाहा- Measles Disease: लहान मुलांमध्ये गोवरचा उद्रेक, ‘अशी’ घ्या काळजी!

वॉश बेसिन –

अनेकवेळा गडबडीत वॉश बेसिन साफ ​​करणं राहून जातं. त्यामुळे ते खराब होते आणि डाग जमा होतात. ते डाग काढणे खूप कठिण जाते. पण तेच जर तुम्ही डिटर्जंटमध्ये थोडासा लिंबाचा रस घालून वॉश बेसिनमध्ये टाकून ब्रशने नीट साफ केले तर वॉश बेसिन चमकून उठेल.

खराब कपडे करा स्वच्छ –

स्वयंपाकघरात असं एक कापड ठेवलेलं असतं की त्याचा वापर हात पुसण्यासाठी केला जातो, त्यामुळे तो कपडा पुर्ण खराब होतो. शिवाय घरातील पायपुसणं देखील खूप खराब होतं. ही खराब झालेली कपडे या डिटर्जंट पावडरच्या पाण्यात भिजत घालून धुतली तर ती स्वच्छ निघतात आणि पाण्याचीही बचत होते.

Story img Loader