Lifestyle Tips : बहुतेक लोक केसांची काळजी घेण्यासाठी अनेक टिप्स फॉलो करतात, महागडे हेअर केअर प्रोडक्ट्स वापरतात, पण त्यानंतरही त्यांचे केस निस्तेज, निर्जीव दिसू लागतात. केसांमधील कोरडेपणा वाढतो. अशावेळी तुम्ही केस धुण्यासाठी कोणतं पाणी वापरता याकडे लक्ष देणं गरजेचे आहे. आजही मुंबईसह काही शहरांत बोअरवेल किंवा टँकरचे पाणी पुरवले जाते. हे पाणी कडक असते, त्यात खनिज आणि मिठाचे प्रमाण अधिक असते. महानगरांमध्ये मोठ्या प्रमाणावर आजही क्लोरीन असलेल्या पाण्याचा पुरवठा केला जातो. पण, अशाप्रकारच्या पाण्याने केस धुतल्यास अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. कारण या पाण्यात कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि इतर अनेक खनिजे जास्त प्रमाणात असतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या पाण्यामुळे केसांचे नुकसान कसे होते?

अशाप्रकारच्या पाण्यातील खनिजांचा केसांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो. विशेषत: टाळू आणि केसांवर ही खनिजं जमा होता, ज्यामुळे कालांतराने केस कोरडे आणि खराब दिसू लागतात. इतकंच नाही तर यामुळे केस गळतीची समस्यादेखील जाणवते. केसात मोठ्या प्रमाणात कोंडा होतो, खाज सुटू लागते.

बोअरवेल किंवा टँकरच्या पाण्याने केस धुताना काय काळजी घ्यावी?

जर तुम्हालाही अशाप्रकारच्या पाण्याच्या वापरामुळे केसांसंबंधित समस्या जाणवत असतील तर तुम्ही खालील उपाय करू शकता.

१) पाणी उकळून घ्या

बोअरवेल किंवा टँकरचं पाणी उकळून घेतल्यास त्यातील कडकपणा बऱ्याच प्रमाणात कमी करता येतो. तुम्ही हे पाणी उकळून थंड करून मग त्याने केस धुवू शकता.

२) बेकिंग सोडा

बेकिंग सोड्यामध्ये असलेले सोडियम कार्बोनेट पाण्यातील कडकपणा कमी करण्यास मदत करते. तुम्ही अशा पाण्यात थोड्या प्रमाणात बेकिंग सोडा मिसळू शकता. या पाण्याने केस धुण्यापूर्वी पॅच टेस्ट जरूर करा.

३) अ‍ॅपल सायडर व्हिनेगर

अ‍ॅपल सायडर व्हिनेगरने पाण्यातील कडकपणा कमी करता येतो. अशा पाण्याने केस धुण्यासाठी तुम्ही एक चमचा अ‍ॅपल सायडर व्हिनेगर मिसळा आणि त्या पाण्याने केस धुवा. यामुळे टाळूवर जमा झालेले खनिजे काढून टाकण्यास मदत होते.

४) वॉटर सॉफ्टनर

तुम्ही अशा पाण्यात वॉटर सॉफ्टनर वापरून त्यातील कडकपणा दूर करू शकता. वॉटर सॉफ्टनर हे एक असे डिव्हाइज आहे, जे कडक पाण्यात असलेले मिनरल्स फिल्टर करते आणि त्याचे सॉफ्ट वॉटरमध्ये रूपांतर करते.

५) क्लोरिफाइंग शॅम्पू

या व्यतिरिक्त तुम्ही केस धुण्यासाठी क्लोरिफाइंग शॅम्पू वापरू शकता, यामुळे केसांमधील कोंडा, घाण निघून जाते. महिन्यातून एकदा किंवा दोनदा त्यांचा वापर करणे फायदेशीर ठरू शकते.