नैसर्गिकरित्या मऊ आणि गुलाबी ओठ असणे प्रत्येकाची इच्छा असते. मात्र, जशी आपण त्वचेची, केसांची काळजी घेतो तशी ओठांची काळजी घेतली जात नाही. सहसा त्यावर एखादी लिपस्टिक किंवा लिप बाम लावून आपण तो विषय सोडून देतो. मात्र, तुम्हाला तुमचे ओठ नैसर्गिकरित्या गुलाबी आणि मऊ ठेवायचे असतील तर या काही गोष्टी आहे, ज्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चेहरा उजळण्यासाठी, त्यावर चमक येण्यासाठी जसे आपण त्वचा स्क्रब करतो, त्वचेवरील मृत त्वचा काढून टाकण्यासाठी आपण तिला एक्सफॉलिएट [exfoliate] करतो; अगदी त्याच पद्धतीने आपण ओठांवरही स्क्रब करणे गरजेचे असते. आपल्या ओठांचे सौंदर्य वाढवण्यासाठी पुढील टिप्स पाहा

१. घरगुती स्क्रब

ओठांवरील मृत त्वचा काढून टाकण्यासाठी घरगुती स्क्रब वापरून पाहा. यासाठी थोडी साखर, मध किंवा खोबरेल तेलामध्ये मिसळून आपल्या ओठांवर लावून त्यांना हलक्या हाताने स्क्रब करा. असे केल्याने मध किंवा खोबरेल तेलातून ओठांना मऊ होण्यास/मॉइश्चराइझ्ड होण्यास मदत होते.

हेही वाचा : चमकदार त्वचेसाठी ‘कोरियन स्किन केअर’ हॅक; स्वयंपाकघरातील केवळ ‘हा’ पदार्थ वापरा; पाहा टिप्स…

२. मऊ ब्रशचा वापर

दात घासायचा अतिशय मऊ दातांच्या ब्रशचा वापर करून तुम्ही तुमचे ओठ नैसर्गिकरित्या गुलाबी ठेऊ शकता. यासाठी कोमट पाण्यात काही मिनिटांसाठी हा मऊ दातांचा ब्रश भिजवून ठेवा. नंतर आपल्या ओठांवर त्या ब्रशच्या मदतीने मसाज करा. यामुळे तुमच्या ओठांवरील डेड स्कीन म्हणजेच मृत त्वचा निघून जाण्यास मदत तर होतेच, सोबत तेथील रक्तपुरवठा चांगला होऊन ओठांवर गुलाबी छटा येण्यास मदत होते.

३. ओठ हायड्रेट ठेवणे

आपल्या पूर्ण शरीराच्या आरोग्यासाठी पाणी पिणे महत्वाचे असते. त्वचा कोरडी पडू नये यासाठी आपल्याला वारंवार भरपूर पाणी पिण्याचा सल्ला दिला जात असतो. अगदी त्याचप्रमाणे ओठ कोरडे पडू नये, ओठांची सालं निघू नये व ते हायड्रेटेड राहावे यासाठी योग्य प्रमाणात पाणी प्यावे.

४. नैसर्गिक घटक असणारे लीप बाम

ज्या लिप बाममध्ये शे बटर, कोको बटर किंवा बदामाचे तेल यांसारखे घटक असतील, अशा चांगल्या दर्जाच्या उत्पादनांचा वापर करावा. त्याचबरोबर या लिप बामचा दररोज वापर करावा, म्हणजे ओठ मऊ राहतील आणि काळवंडणार नाहीत.

हेही वाचा : घरातील ‘हा’ नेहमीच्या वापरातील पदार्थ त्वचा ठेवेल मऊ अन् चमकदार; पाहा हा घरगुती उपाय

५. सतत ओठांवरून जीभ फिरवणे

दिवसभरात आपल्या ओठांचा कोरडेपणा आपल्याला जाणवला की नकळत आपण त्यावरून जीभ फिरवतो. असे केल्याने तात्पुरता आराम मिळत असला तरीही त्याचे काही तोटेदेखील आहेत, अशी माहिती टाइम्स ऑफ इंडियाच्या एका लेखावरून समजते. आपल्या लाळेमध्ये एंजाइम [शरीरात आढळणारे एक प्रकारचे प्रथिन] नावाचा घटक असतो. तो तुमच्या ओठांच्या नाजूक त्वचेसाठी त्रासदायक ठरू शकतो. त्यामुळे ओठ कोरडे जाणवत असल्यास, लिप बामचा वापर करावा.

६. गुलाबाच्या पाकळ्यांचा वापर

गुलाबाच्या काही पाकळ्या दुधामध्ये भिजवून ठेऊन नंतर त्याची एक पेस्ट बनवून घ्या. तयार केलेली पेस्ट ओठांवर १५ मिनिटांसाठी लावून ठेवा. ओठांना नैसर्गिकरित्या गुलाबी रंग देण्यासाठी ही ट्रिक उपयुक्त ठरते.

७. बीटापासून बनवलेला लीप बाम

बीट नुसते हातात घेतले तरीही त्याचा रंग आपल्या बोटांना लागतो. त्यामुळे त्याचा वापर करून तुम्ही तुमच्या ओठांना सुंदर गुलाबी रंग देऊ शकता. यासाठी बीटाच्या रसात थोडेसे खोबरेल तेल मिसळून ओठांना लावू शकता.

८. डाळिंबाच्या दाण्यांचा स्क्रब

डाळिंबाचे दाणे भरभरीत कुस्करून/कुटून त्याचा एक स्क्रब बनवून घ्या. ओठांवर या डाळिंबापासून बनवलेल्या नैसर्गिक स्क्रबचा वापर केल्याने त्यामध्ये असणाऱ्या अँटिऑक्सिडंट्समुळे ओठांवरील मृत त्वचा निघून जाण्यास मदत होते आणि त्यांना नैसर्गिकरित्या गुलाबी रंग मिळतो.

हेही वाचा : २०२३ चे सर्वाधिक चर्चेत असलेले ‘हे’ पाच मेकअप ट्रेंड्स बघा; ‘लिप ग्लॉस नेल्स’ ते ‘क्लाउड स्किन’ यादी पाहा….

९. सूर्यकिरणांपासून रक्षण करा

ज्याप्रमाणे हानिकारक सूर्यकिरणांचा तुमच्या त्वचेला त्रास होतो, त्याचप्रमाणे त्याचा त्रास तुमच्या ओठांंनादेखील होत असतो. त्यामुळे ज्या लिप बाममध्ये हानिकारक सूर्यकिरणांपासून रक्षण करणारे एसपीएफ [SPF] असेल, त्या उत्पादनांचा वापर करावा. यामुळे तुमचे ओठ मऊ होतील आणि ते काळवंडणारसुद्धा नाहीत.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lip care pink and soft lips use this simple and useful exfoliation tips and tricks dha
Show comments