Makeup Tips: मेकअप करणं प्रत्येक मुलीला आवडतं. आपण सुंदर दिसावं असं प्रत्येक मुलीला वाटतं असत. यासाठी मुली पार्लरमध्ये जातात तसंच मेकअपवर पैसे खर्च करण्यास मागेपुढे पाहत नाहीत. चेहऱ्याच सौंदर्य वाढविण्यासाठी महागडे उत्पादने वापरतात. चेहऱ्यावरील मेकअपचा विचार केला तर प्रत्येक भाग उठून दिसण्यासाठी त्या भागावर विशिष्ठ पद्धतीचा मेकअप केला जातो. मात्र, यात सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे ओठ जे सौंदर्यात भर घालण्याचे काम करतात. त्यामुळे मेकअप करताना ओठांच्या कॉन्टूरिंगकडे विशेष लक्ष दिले पाहिजे, तरच तुमच्या मेकअपला परफेक्ट लुक मिळेल. ओठांना चांगला आकार देण्यासाठी काही सोप्या टिप्स आहेत, ज्या तुम्हाला मेकअप करताना लक्षात ठेवायला हव्यात.
ओठ कॉन्टूरिंगच्या टिप्स
१) सर्वप्रथम लिप कॉन्टूरिंगचा अर्थ जाणून घेऊया. वास्तविक, यामध्ये लिप लाइनर, ग्लॉस, लिपस्टिक आणि हायलाइटर वापरून ओठांचा मूळ आकार वाढवला जातो. असे केल्याने त्यांचे सौंदर्य द्विगुणित होते. ज्यांचे ओठ पातळ आहेत त्यांना लिप कॉन्टूरिंग मदत करते. तर जाड ओठ संतुलित असतात.
२) आजकाल पातळ ओठ जाड दिसण्यासाठी मुलींना फिलर्सही मिळत आहेत, हा खूप महागडा उपचार आहे. काहीवेळा या शस्त्रक्रियेचे वाईट परिणाम देखील दिसतात, ज्यामुळे ओठांचा आकार खराब होतो. त्यामुळे कॉन्टूरिंग हा तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय आहे. हे फिलरपेक्षा चांगले आणि सुरक्षित मानले जाते. यामुळे तुम्हाला कुठलाही त्रास होत नाही.
३) हे करण्यासाठी, प्रथम तुम्हाला तुमचे ओठ स्क्रबरने एक्सफोलिएट करावे लागतील. त्यानंतर त्यांना मॉइश्चरायझ करावे लागेल. मग ओठांच्या बाहेर लिप लाइनर बनवावे लागेलं. नंतर दिलेल्या आकारात लिपस्टिक लावावी लागेल, त्यानंतर तुम्हाला ती ब्रशने ब्लेंड करावी लागेल. असे केल्याने लिपस्टिकचा रंग ओठांचा आकार स्पष्ट करेल. हे सगळं झालं की नंतर हायलाइटर आणि लिप ग्लॉस लावावा. जर तुम्हाला तुमच्या ओठांना बोल्ड लूक द्यायचा असेल तर तुम्ही आणखी एक शेड लावू शकता.