आला आला हिवाळा.. हिवाळा आला की, तापमान खालावतं आणि त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण होतो. थंडीच्या दिवसांत आरोग्याकडे खासकरुन त्वचेकडे लक्ष देण्याची फार गरज असते.‘ओठ’ हा आपल्या व्यक्तिमत्त्वाचा खूप महत्त्वाचा भाग आहे. कोरडे ओठ केवळ दिसायला अनाकर्षक वाटतात. याशिवाय आपला आत्मविश्वासदेखील जरा डगमगून जातो. मात्र, काळजी करू नका ‘या’ टिप्स बनवतील तुम्हाला आकर्षक, तुम्हीही दिसाल सुंदर…

हिवाळयात असं होतचं !
ओठांची त्वचा अतिशय पातळ आणि संवेदनशील असल्यानं ओठ कोरडे होणं आणि त्यांना तडे जाणं ही बाब खूप सामान्य आहे. फुटलेले ओठ कोणत्याही वयात आणि कोणत्याही ऋतूत होऊ शकतात. पण हिवाळ्यात हा त्रास वाढतो. याशिवाय, ते शरीरात पाणी कमी झाल्याचं किंवा व्हिटॅमिनच्या कमतरतेचंही लक्षण असू शकतं. फाटलेल्या ओठांची समस्या असताना बहुतेक मुलांना लिप बाम वगैरे लावायची सवय असते. पण लक्षात घ्या, बाजारात उपलब्ध असलेले बहुतेक केमिकलयुक्त लिप बाम मोठया प्रमाणावर विक्रीला येतात. या आकर्षक दिसणाऱ्या लिपबाम पासून आपण सावध राहून घरगुती उपाय करावेत.

chaturang article
‘भय’भूती : भयातून अभयाकडे
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Lucknow NGO helps underprivileged children make Sabyasachi-inspired clothes; the designer reacts
झोपडपट्टीतील मुला-मुलींनी तयार केला सब्यसाची-प्रेरित ब्रायडल कलेक्शन! स्वत:च मॉडेलिंग करत केले हटके फोटोशूट, पाहा Video Viral
attention deficit hyperactivity disorder
उनाड मुलेच नव्हे, तर प्रौढांमध्येही जगभर वाढतेय अतिचंचलता? काय आहे ADHD? लक्षणे कोणती? आव्हाने कोणती?
Emotional message for father
“डोळ्यातले अश्रु डोळ्यांतच जिरवण्याची ताकद फक्त ‘बापाकडे’ असते” तरुणाची पाटी होतेय व्हायरल, VIDEO एकदा पाहाच
lead in turmeric FSSAI
तुमच्या आहारातील हळद विषारी आहे का? संशोधनात हळदीत आढळून आली ‘या’ हानिकारक धातूची भेसळ
Boyfriend surprises his blind girlfriend with a braille proposal video
याला म्हणतात खरं प्रेम! अंध गर्लफ्रेंडला बॉयफ्रेंडनं केलं अनोखं प्रपोज; VIDEO पाहून तरुणाचं कराल कौतुक

आणखी वाचा : यंदाच्या दिवाळीत ‘असा’ करा झटपट मेकअप; अधिक फुलून उठेल तुमचे सौंदर्य!

सुंदर ओठांसाठी फॉलो करा ‘या’ घरगुती टिप्स

फाटलेल्या ओठांवर दररोज २-३ वेळा मध लावावे. थोडसं मध रात्री झोपण्यापूर्वी लावावं. दिवसातून २-३ वेळा ओठांवर ऑलिव्ह ऑइल किंवा खोबरेल तेल लावल्यास फुटलेल्या ओठांना काहीसा आराम मिळतो. १ चमचा दूध आणि १ चमचा मध एकत्रित करुन हे मिश्रण फ्रिजमध्ये ठेवा. त्यानंतर थंड झाल्यास हे मिश्रण ओठांवर हलक्या हाताने लावा. ओठ फाटल्यानंतर ओठांवरील निघालेली त्वचा काढू नका. असे केल्यास ओठ आणखीन फाटण्याची शक्यता असते तसेच दुखापतही होऊ शकते. ओठांना लीप लोशन किंवा लीप बाम लावून घराबाहेब पडावे.थंडीत अतिशय थंड पाण्याने आंघोळ केल्यामुळे त्वचा जास्त ड्राय पडू शकते.अनेकांच्या शरीराला क्रीम लावल्याने रिअॅक्शनही येऊ शकते. त्यामुळे अशा क्रीम लावण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.याप्रकारे वरील टिप्स आपण फॉलो केल्या तर नक्कीच आपले ओठ आधिक सुंदर आणि आकर्षक दिसेल.