महिला त्यांचा लूक अधिक खुलून दिसण्यासाठी विविध रंगाच्या लिपस्टिक्स लावतात. पण, आता लिपस्टिक लावणा-या महिलांनो सावध व्हा.. कारण एका नव्या परीक्षणानुसार जास्त लिपस्टिक लावल्यामुळे मेंदूवर परिणाम होऊ शकतो. लिपस्टिकसारख्या उत्पादनांमध्ये शिसे वापरलेले असते. या धातूच्या केवळ संपर्कात जरी आले, तरी मेंदू आणि आकलनशक्तीवर विपरीत परिणाम होतो.
संशोधकांनी २२ वेगवेगळ्या ब्रँडवर परीक्षण केले. त्यानुसार, सध्याच्या ५५% लिपस्टिक्समध्ये विषारी तत्वे असल्याचेही आढळून आले आहे. ‘अंडररायटर्स’ प्रयोगशाळेत केल्या गेलेल्या चाचणीमध्ये १२ लिपस्टिक्समध्ये शिशाचे सर्वाधिक प्रमाणही आढळले. त्यामुळे काहीवेळा कमी प्रमाणातील लावलेली लिपस्टिकदेखील त्याचा आरोग्यावर गंभीर आणि मानसिक परिणामही होऊ शकतो, असे डॉ. सीन पालफ्रे यांनी सांगितले आहे. तसेच, त्यांनी लिपस्टिकपासून सावध राहण्याचाही इशारा दिला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा