आता सुंदर दिसण्यासाठी ब्युटी पार्लर किंवा जीम जाण्याची गरज नाही. तर, लिक्विड डाईट घेऊन तुम्ही नैसर्गिक सुंदरता मिळवू शकता. हॉलंड युनिव्हर्सिटीच्या शोधकर्त्यांनी २४० लोकांवर परीक्षण करून हे स्पष्ट केले आहे की जर महिन्यातून ३ दिवस तुम्ही लिक्विड डाईट घेतले तर दीर्घकाळापर्यंत तुम्ही निरोगी आणि तरुण दिसू शकता.
धकधकाच्या या जीवनात स्वत:ला फिट ठेवण्यासाठी वेळ काढणे फारच कठीण झाले आहे. पण महिन्यातून ३ दिवस तुम्ही फक्त ज्यूस डाईट वर राहिले पाहिजे. ज्यात फळ, भाज्या इत्यादींचा ज्यूस घेऊ शकता. संशोधकांच्या मते लिक्विड डाईट महिन्यातून ३ वेळा घ्यायला पाहिजे. या मुळे शरीर ताजेतवाने होते. सेल्स संतुलित होतात व त्वचेशी निगडित आजार दूर होण्यास मदत मिळते. म्हणजे ही बॉडीला डीटॉक्सीनेट करते. जर हा प्रयोग तुम्ही सलग तीन दिवस केला तर जास्त फायदेशीर ठरते.
मात्र, लिक्विड डाईट घेत असताना फळ व भाज्यांचा सूप एकत्र घेऊ नये. एकाच वेळेस ३ पेक्षा जास्त फळांचा रस मिक्स करून पिऊ नये. या गोष्टींची काळजी घेणे फार आवश्यक आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा