रक्षाबंधन म्हणजेच राखीपौर्णिमा. या दिवशी बहीण आपल्या भाऊरायाला राखी बांधते. भाऊ-बहिणीच्या नात्यातील हा एक आनंदाचा दिवस असतो. भावाने बहिणीच्या रक्षणाची जबाबदारी घ्यायची या संकल्पनेचे प्रतीकात्मक सांस्कृतिक रूप म्हणजे रक्षाबंधनाचा सण. श्रावणतील महत्त्वाच्या सणांमध्ये रक्षाबंधनाचाही समावेश होतो. या सणामागे विविध कहाण्या प्रचलित आहेत. प्रदेशानुसार कहाण्या बदलल्या तरी आपल्या माणसाला प्रेमाच्या रेशीमबंधांनी जखडून ठेवायचे, ही कल्पना मात्र सगळीकडे समान आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी बहीण आपल्या भावाच्या उजव्या हाताच्या मनगटावर राखी बांधून भावास दीर्घ आयुष्य व सुख लाभो म्हणून प्रार्थना करते व भाऊ तिचे रक्षण करण्याचे वचन देतो.
देशभरातील भाऊबहीण या दिवसाची आतुरतेने वाट पाहत असतात. या दिवशी भाऊ आपल्या लाडक्या बहिणीला भेटवस्तूही देतात. यंदा ३० ऑगस्ट रोजी संपूर्ण देशात रक्षाबंधन साजरा करण्यात येणार आहे. शुभ मुहूर्ताच्या वेळी भावाला राखी बांधल्यास हे फलदायी सिद्ध होते. रक्षाबंधनाच्या दिवशी बहीण आपल्या भावाच्या उजव्या हाताच्या मनगटावर राखी बांधून भावास दीर्घ आयुष्य व सुख लाभो म्हणून प्रार्थना करते व भाऊ तिचे रक्षण करण्याचे वचन देतो. रक्षाबंधन सणाप्रमाणे दक्षिण भारतात कार्तिक महिन्यात काíतकेय सण असतो. या दिवशी बहीण आपल्या भावास जेवण देऊन त्याच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करते व भाऊ तिचे रक्षण करण्याचे वचन देतो.
हेही वाचा : पोटदुखी किंवा अॅसिडिटीचा त्रास होतोय? मग रात्रीच्या जेवणात ‘हे’ पदार्थ खाणे टाळा
मात्र कधी कधी परिस्थिती अशी असते की भाऊ हा शिक्षणासाठी कुठेतरी दूर राहत असतो. मग शिक्षण नोकरी किंवा अन्य कारणांमुळे तो घरापासून लांब राहतो. तर अशावेळी रक्षाबंधन एकत्रितपणे साजरे करणे शक्य होत नाही. तसेच भाऊ जसा दार असू शकतो तशी बहीण देखील शिक्षणासाठी किंवा लग्न झाले असेल तर घरापासून दूर राहते. तर अशावेळी रक्षा बंधन कसे साजरे करायचे? हा प्रश्न अनेकांना पडत असतो. तर आज आपण असे काही उपाय पाहुयात ज्यामुळे तुम्हाला भाऊ किंवा बहीण जवळ नसेल तरीही रक्षाबंधन साजरा करता येईल.
ऑनलाइन किंवा पोस्टाने राखी पाठवावी
जर आपला भाऊ रक्षाबंधनाच्या दिवशी घरी नसेल तर तुम्ही त्याला तुम्ही ऑनलाइन किंवा कुरिअर, पोस्टाद्वारे राखी पाठवू शकता. याप्रकारे देखील तुम्ही रक्षाबंधन साजरे करू शकता. तसेच भाऊ याच प्रकारे तुम्हाला तुमचे गिफ्ट देखील पाठवू शकतो.
रक्षाबंधन ऑनलाइन पद्धतीने साजरे करावे
रक्षाबंधनाच्या दिवशी भाऊ किंवा बहीण एकमेकांपासून दूर असल्यास तुम्ही त्या दिवशी चांगले तयार होऊन ऑनलाइन पद्धतीने रक्षाबंधन साजरा करू शकता. चांगल्या प्रकारे तयार झाल्यानंतर तुम्ही एकमेकांना व्हिडीओ कॉल करू शकता. तसेच व्हिडीओ कॉलवरच राखी बांधून रक्षाबंधन साजरे करू शकता. तसेच एकमेकांशी गप्पा देखील मारू शकता.
व्हिडीओ किंवा मेसेज रेकॉर्ड करून पाठवा
बऱ्याच वेळेला अशी परिस्थिती असते की रक्षाबंधन या सणादिवशी भाऊ किंवा बहीण एकत्र नसतात. तेव्हा तुम्ही एकमेकांना व्हिडीओ किंवा ऑडिओ मेसेज रेकॉर्ड करून देखील पाठवू शकता. अशा प्रकारे तुम्ही एकमेकांना शुभेच्छा देऊ शकता.