मानसिक तणाव, चिंता या मानवी आयुष्याच्याच भाग आहेत, परंतु त्यांचा अतिरेक मानवी आरोग्यास बाधक आहे. अधिक चिंता व तणावग्रस्त असलेल्या व्यक्तीला पुढे मानसिक आजाराला सामोरे जावे लागते. या व्यक्तीला पुढे अनेक मानसिक विकार जडतात आणि त्यातून बाहेर येण्यासाठी खूपच वेळ लागतो, असे कॅनडामधील संशोधकांनी म्हटले आहे.
विवंचना, भीती आणि तणाव यांचे गंभीर परिणााम भोगावे लागतात. दैनंदिन जीवनात अनेक कारणांनी तणाव येतो, पण जेव्हा सातत्याने तणावग्रस्त राहिलात तर मनोविकार जडतात. त्याचा परिणाम दैनंदिन जीवनातील कामावर, नोकरीवर आणि कुटुंबावरही होऊ शकतो, असे कॅनडातील रोटमन रिसर्च इन्स्टिटय़ूटच्या संशोधकांनी सांगितले.
दिर्घकालीन तणाव हा रोगनिदानशास्त्रानुसार यापूर्वीपासून असणाऱ्या तीव्र शारीरिक तणावाचे पडसाद असतात. ज्यांचा परिणाम तीव्रतेने रोगप्रतिकारक क्षमतेवर, चयापचायाच्या क्रियेवर, हृदय व रक्तवाहिन्या, मज्जातंतूवर आणि मेंदूतील दीर्घकाळ स्मरण क्षमतेवरही होत असतो.
संशोधकांनी अभ्यासासाठी वापरलेल्या प्राण्यांमध्ये तणाव आणि भीतीमुळे होणाऱ्या बदलांसोबतच मानसशास्त्रानुसार तणाव व विवंचनेवेळी वैयक्तिक किंवा अनेक चेतापेशींमधील बदल दर्शिविणाऱ्या प्रतिमांचादेखील अभ्यास केला. या मागचा उद्देश हा केवळ ताण आणि भीतीवेळी चेतापेशींमध्ये होणारे बदल आणि त्याचे दीर्घकालीन तणावात होणारे परिवर्तन हे अभ्यासणे हाच होता. या वेळी तीनही परिस्थितीमध्ये झालेले बदल हे मेंदूतील मज्जातंतूवर प्रचंड ताण निर्माण करतात. ज्यामुळे दीर्घकालीन तणाव आणि मज्जातंतूमधील विस्कळीतपणा, मग त्यात नैराश्य आणि अल्झेमिरचा आजार (मेंदूतील बिघाडामुळे होणारी व्याधी) यांचादेखील समावेश होत असल्याचा संशोधकांचा दावा आहे.
रोगनिदानशास्त्रानुसार विवंचना आणि दीर्घकालीन तणाव यांची बांधणी मज्जातंतूच्या क्रियांवर व प्रीफ्रोन्टिअल कोरटेक्स (पीएफसी)यांच्या अध:पतनाकडे होत असते. ज्यामुळे मज्जातंतूतील विस्कळीतपणा हा नैराश्य आणि वेडसरपणा यालाही कारणीभूत ठरू शकतो, असे मत या इन्स्टिटय़ूटच्या लिंडा माह यांनी व्यक्त केले. यासाठी नैराश्य टाळण्यासाठीची उपचार पद्धती आणि शारीरिक व्यायामाची गरजही त्यांनी व्यक्त केली.
(टीप : ‘आरोग्यवार्ता’मधील बातम्या या जगभरातील संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर आधारित असतात. त्यामुळे त्यातील मतांशी ‘लोकसत्ता’चा संबंध नाही. कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा