कुटुंब सुरू करू इच्छिणाऱ्या व्यक्ती आणि जोडप्यांसाठी शुक्राणू दाता/स्पर्म डोनर (sperm donor) शोधणे हे एक कठीण काम असू शकते. पारंपरिक प्रजनन क्लिनिक (fertility clinic) अजूनही एक पर्याय असला तरी अनेक महिला, विशेषतः समलिंगी संबंध असलेल्या किंवा एकट्या महिला, शुक्राणू दाता शोधण्यासाठी ऑनलाइन प्लॅटफॉर्म, अॅप्स आणि सोशल मीडियाकडे वळत आहेत. पण, या वाढत्या ट्रेंडमुळे आव्हाने आणि संभाव्य धोक्यांबद्दल महत्त्वाचे प्रश्नदेखील उपस्थित होतात. जर तुम्ही ऑनलाइन शुक्राणू दाते शोधण्याचा विचार करत असाल, तर तुम्हाला काय माहीत असणे आवश्यक आहे ते येथे आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

स्पर्म डोनेशन ही एक लोकप्रिय निवड आहे (Sperm Donation : It’s a popular choice)

गेल्या दहा वर्षांत केवळ एका ऑस्ट्रेलियन स्पर्म डोनेशन वेबसाइटद्वारे ४,००० पर्यंत मुले जन्माला आल्याचा अंदाज आहे. फक्त २०२२ मध्ये एका खाजगी फेसबुक ग्रुपद्वारे मिळवलेल्या शुक्राणूंमुळे ६९२ जन्म झाल्याचे वृत्त आहे. काही शुक्राणू दाते आणि शुक्राणू दाते शोधणारे (recipients) ऑनलाइन प्लॅटफॉर्म वापरणे पसंत करतात, कारण त्यांना लवकर मैत्री निर्माण करायची असते आणि चांगले संबंध ठेवायचे असतात. काही प्रकरणांमध्ये शुक्राणू दाते त्यांनी दान केलेल्या शुक्राणूंमधून जन्मलेल्या कोणत्याही मुलाच्या आयुष्यात राहणे पसंत करतात.

परंतु, काही स्पर्म डोनर गुप्त राहण्यासाठी ऑनलाइन प्लॅटफॉर्मचा वापर करतात; हा पर्याय प्रजनन क्लिनिकद्वारे शुक्राणू दान करताना सहसा उपलब्ध नसतो. ऑस्ट्रेलियामध्ये प्रजनन क्लिनिकमध्ये डोनरच्या शुक्राणूंची उपलब्धता खूप जास्त असल्याने काही लोक ऑनलाइन शुक्राणू दान करू शकतात. काही क्लिनिकमध्ये शुक्राणू दान व्यवस्थापन शुल्क सुमारे २००० ऑस्ट्रेलियन डॉलर आकारले जाते, यामुळे लोकांना निवडलेल्या डोनरची माहिती मिळू शकते.

त्यानंतर गर्भाधान म्हणजे योनीमध्ये वीर्य सोडली जाण्याची प्रक्रिया (insemination) आणि शुक्राणूंचा खर्च येतो, जो प्रति चक्र सुमारे २५०० युएस डॉलर इतका आहे. ऑस्ट्रेलियामध्ये ऑनलाइन शुक्राणू दान हे परोपकारी (इतरांच्या कल्याणाची निःस्वार्थ) भावनेने केले जाते आणि त्यासाठी काहीही खर्च येत नाही. ग्रामीण किंवा प्रादेशिक भागातील लोक प्रजनन क्लिनिकपासून दूर राहतात, ज्यामुळे प्रवेश आव्हानात्मक ठरतो. मग क्लिनिकमध्ये डोनरच्या शुक्राणूंची कमतरता असते. विशेषतः डोनरमध्ये वांशिक आणि सांस्कृतिक विविधतेचा अभाव असतो. ऑनलाइन शुक्राणू शोधण्याचे कारण काहीही असो, येथे प्रथम विचारात घेण्यासारखे काही मुद्दे आहेत.

१. वैद्यकीय माहिती नाही (Medical unknowns)

क्लिनिकमध्ये शुक्राणू दात्यांची रोग आणि अनुवांशिक समस्यांसाठी कसून तपासणी केली जाते. याउलट, ऑनलाइन दात्यांची तपासणी केली जाऊ शकत नाही, ज्यामुळे प्राप्तकर्त्यांना आणि संभाव्य मुलांना वारशाने संसर्ग किंवा अनुवांशिक स्थितीचा धोका असतो.

२. मानसिक, वैयक्तिक, सामाजिक धोके (Psychological, personal, social risks)
जेव्हा लोक संभाव्य ऑनलाइन शुक्राणू दात्याला प्रत्यक्ष भेटण्यास सहमती देतात तेव्हा त्यांना धोका निर्माण होऊ शकतो. संभाव्य दात्यांनी भेटल्यानंतर लोकांना नैसर्गिकरित्या गर्भाधान (insemination) (लैंगिक संभोग/ sexual intercourse) करण्यासाठी दबाव आणला आहे अशी प्रकरणे नोंदवली गेली आहेत. दात्यांनी सुरुवातीला घरगुती गर्भाधानासाठी (दात्याचे शुक्राणू योनीमध्ये इंजेक्ट करण्यासाठी सिरिंज वापरून) शुक्राणू देण्यास सहमती दर्शविली असूनही हे घडते. समलिंगी महिला जोडप्यांना आणि व्यक्तींना सुरक्षितता आणि शोषणाबद्दल चिंता वाढली आहे, कारण त्यांना गर्भधारणेसाठी पुरुष दात्याबरोबर असुरक्षित लैंगिक संबंध ठेवण्यास भाग पाडले जाऊ शकते, जे भावनिक आणि शारीरिकदृष्ट्या त्रासदायक असू शकते.

राज्य कायदे, प्रजनन केंद्रांमध्ये (fertility clinics) एकाच दात्याच्या शुक्राणूंचा वापर करू शकणाऱ्या व्यक्ती किंवा कुटुंबांची संख्या मर्यादित करतात (राज्यानुसार पाच ते दहा कुटुंबे). ऑनलाइन शुक्राणू दान करण्याचे स्वरूप म्हणजे दात्याने गर्भधारणेसाठी योगदान दिलेल्या मुलांची संख्या याबद्दल कोणतेही रेकॉर्ड ठेवले जात नाहीत. औपचारिक रेकॉर्ड न ठेवता, एक दाता शेकडो लोकांना शुक्राणू देऊ शकतो. यामुळे नकळत भावंडांमध्ये नातेसंबंध निर्माण धोका वाढतो, जिथे दात्याने दान केलेल्या शुक्राणुमुळे गर्भधारण केलेल्या व्यक्तींना झालेली मुले भविष्यात एकमेकांची सावत्र भांवडे ठरू शकतात.

अशी काही प्रकरणे असू शकतात, जिथे दाते त्यांच्या ओळखीबद्दल किंवा पार्श्वभूमीबद्दल सत्य सांगत नाहीत. जसे जपानमध्ये घडले, जेव्हा एखाद्या दात्याने त्याच्या ओळखीबद्दल आणि शिक्षणाबद्दल खोटे बोलल्याचा आरोप केला जातो. शुक्राणू दाता आणि प्राप्तकर्ता (किंवा पालक) दात्याच्या मुलाशी असलेल्या संपर्काच्या किंवा सहभागाच्या पातळीवर सहमत होतात, परंतु नंतर एक पक्ष कराराचे पालन करत नाही किंवा तो बदलू इच्छित नाही, तेव्हा भावनिक संघर्ष आणि हानी होऊ शकते.

३. कायदेशीरदृष्ट्या गुंतागुंतीचे असू शकते (Legally, it’s a grey area)

ऑस्ट्रेलियामध्ये या दानाने जन्मलेल्या मुलावर प्रजनन क्लिनिकमध्ये शुक्राणू दान करणाऱ्या पुरुषाला कोणतेही कायदेशीर अधिकार किंवा बंधने नाहीत. पण, अनौपचारिकरित्या दान केलेल्या शुक्राणूंचा वापर करून मूल जन्माला घालणे कायदेशीरदृष्ट्या अनिश्चित असू शकते. ऑनलाइन शुक्राणू दानाशी संबंधित पालकत्वाबाबतच्या कायदेशीर वादांच्या ऑस्ट्रेलियामध्ये नोंदवलेल्या कोणत्याही प्रकरणांची आम्हाला माहिती नाही. पण, जर ही प्रथा वाढत राहिली तर आईच्या इच्छेविरुद्ध दात्याने जन्मलेल्या मुलाशी संबंधित काही अधिकारांचा वापर करण्याचा प्रयत्न करत असेल तर न्यायालयांना हस्तक्षेप करावा लागू शकतो.

पण, २०१९ मध्ये एका मित्राने शुक्राणू दान केल्याचा एक खटला चर्चेत आला होता. येथे उच्च न्यायालयाने असा निर्णय दिला की, ज्या पुरुषाने त्याच्या मित्राला अनौपचारिकपणे शुक्राणू दान केले होते, तो मुलाचा कायदेशीर पालक मानला जातो. यामुळे आई आणि तिच्या समलिंगी जोडीदाराला मुलासह आणि त्यांच्या भावंडांसह न्यूझीलंडमध्ये स्थलांतरित होण्यापासून रोखले गेले. प्रत्येक संभाव्य प्रकरण त्याच्या स्वत:च्या विशिष्ट परिस्थितींवर अवलंबून असल्याने, प्रथम कायदेशीर सल्ला घेणे चांगले.

४. बाळासाठी काय चांगले आहे? ( What’s best for the child?)

अनेक दात्यांना गर्भधारणेदरम्यान जन्मलेल्यांना त्यांच्या दात्याबद्दल माहिती हवी असते आणि त्यांच्याशी संपर्क साधायचा असतो. वैद्यकीय माहितीसह माहितीचा अभाव मानसिक, वैद्यकीय आणि सामाजिक हानींना कारणीभूत ठरू शकतो. म्हणून लोकांनी काळजीपूर्वक विचार करावा की, “ही व्यवस्था गर्भवती असलेल्या कोणत्याही बाळावर कसा परिणाम करू शकते. यामध्ये एकाच दात्याच्या शुक्राणूचा वापर करून गर्भवती झालेल्या कोणत्याही भावंडांना भेटण्याची त्यांची संभाव्य इच्छा समाविष्ट आहे.”

कोणती खबरदारी घ्यावी?

दात्याच्या शुक्राणूंचा वापर करून मूल जन्माला घालण्याचा निर्णय गुंतागुंतीचा ठरू शकतो. दात्याच्या शुक्राणूंचा वापर कसा करायचा हे ठरवताना, लोकांना त्यांच्या पर्यायांबद्दल मान्यताप्राप्त प्रजनन सल्लागाराशी बोलणे फायदेशीर ठरू शकते. यामध्ये प्रजनन क्लिनिकद्वारे दात्याच्या शुक्राणूंचा वापर करणे समाविष्ट असू शकते, जे काटेकोरपणे नियंत्रित आणि परवानाकृत आहेत आणि त्यांना राज्य कायदे आणि नैतिक मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणे आवश्यक आहे.

नियमित प्रजनन क्लिनिकद्वारे दात्याच्या शुक्राणूंचा वापर करणे अधिक महाग आणि वेळखाऊ असू शकते, परंतु ते ऑनलाइन शुक्राणू दानापेक्षा लक्षणीयरीत्या सुरक्षितदेखील आहे. काही लोक प्रजनन क्लिनिकद्वारे दात्याच्या शुक्राणूंचा वापर करू इच्छित नसतील किंवा ते त्यांच्या गरजा पूर्ण करू शकत नाहीत, आपण हे का ते समजून घेतले पाहिजे, जेणेकरून आपण त्याबद्दल काहीतरी करण्याचा प्रयत्न करू शकतो.

जर एखाद्या व्यक्तीने ऑनलाइन दात्याच्या शुक्राणूंचा वापर करण्याचा निर्णय घेतला तर त्यांनी संभाव्य दात्याशी खुली आणि प्रामाणिक चर्चा केली पाहिजे. त्यांचा वैद्यकीय इतिहास, त्यांच्या शुक्राणूंचा वापर करून जन्मलेल्या मुलाच्या भविष्यातील आयुष्यात त्यांची कोणती भूमिका आहे, याबाबत सर्व जण रेकॉर्ड आणि संपर्क माहिती ठेवू शकतात. सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी, एखाद्या विश्वासू मित्राला किंवा कुटुंबातील सदस्याला संभाव्य दात्यासोबतच्या भेटीबद्दल कळवा. ही खबरदारी ऑनलाइन शुक्राणू दान, हा एक सकारात्मक अनुभव बनविण्यास मदत करू शकते