तुमचे आधार कार्ड हरवले आहे आणि आधार नावनोंदणी आयडी (EID) सुद्धा सापडत नाही? काळजी करू नका, तुम्हाल खाली दिलेल्या माहितीचा नक्कीच फायदा होईल. तुम्हाला फक्त हेल्पलाईन क्रमांक ‘१९४७’ डायल करायचा आहे किंवा तुम्ही यूआयडीएआयन या वेबसाइटद्वारे आपला फोन नंबर वापरूनही हे करू शकता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यूआयडीएआयचे ट्विट

“आधार हरवला आणि नावनोंदणी स्लिप देखील हरवली? काळजी करू नका. आमच्या हेल्पलाईन १९७४ वर फोन करून तुम्ही तुमचा ईआयडी (नावनोंदणी आयडी) मिळवू शकता. तुम्ही तुमचा ईआयडी किंवा यूआयडी (आधार) ऑनलाइन देखील मिळवू शकता, ”यूआयडीएआयने एका ट्विटमध्ये म्हटले आहे.
जर तुम्ही यूआयडीएआय (UIDAI) वेबसाइटला भेट देऊन तुमचा नंबर मिळवणार असाल तर हरवलेल्या आधार UID/EID पुनर्प्राप्तीसाठी विनंती सबमिट करा. तुमचे आधार फोन नंबरशी लिंक करणे महत्त्वाचे का आहे याचे आणखी एक कारण म्हणजे यामुळे तुम्हाला सर्व संबंधित सेवा ऑनलाइन शोधण्यात मदत होते.

या स्टेप्स करा फॉलो

स्टेप १ : UIDAI च्या अधिकृत वेबसाइटवर लॉग इन करा.

स्टेप २ : मुख्यपृष्ठावर, ‘ रिट्रीव्ह लॉस्ट यूआयडी/ईआयडी ‘ या पर्यायावर क्लिक करा. एक नवीन पेज उघडेल.

स्टेप ३ : तुम्हाला दोन पर्याय दिसतील: रिट्रीव्ह आधार क्रमांक (UID) किंवा रिट्रीव्ह आधार नोंदणी क्रमांक (EID). एका पर्यायावर क्लिक करा.

स्टेप ४ : नाव, ईमेल आयडी, मोबाईल नंबर सारखे विचारलेले सर्व तपशील भरा.

स्टेप ५: मोबाईलवर आपला आधार क्रमांक प्राप्त करण्यासाठी पेजच्या डाव्या बाजूला ‘आधार क्रमांक’ हा पर्याय निवडा.

स्टेप ६ : पडताळणीसाठी कॅप्चा भरा.

स्टेप ७ : ओटीपी पाठवा पर्यायावर क्लिक करा.

स्टेप ८ : OTP भरा.

स्टेप ९ : तुमचा आधार क्रमांक किंवा नावनोंदणी आयडी तुमच्या फोन नंबरवर पाठवला जाईल.

या सोप्या स्टेप्स तुम्ही फॉलो करून नंबर मिळवू शकता.