भात खाणे प्रत्येकाला आवडत असतं. मात्र आपल्यापैकी बरेचजण वजन कमी करण्याच्या हेतूने भात खाणे टाळतात. तसेच वजन कमी करायचं असेल तर भात खाऊ नका असा नेहमी सल्ला दिला जातो. पण भात खाणे पुर्णपणे टाळावे का? यावेळी पोषणतज्ञ ऋजुता दिवेकर यांनी भात खाणे पुर्णपणे टाळावे असे त्यांना वाटत नाही. असे इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत त्यांनी यासंदर्भात स्पष्ट केले आहे.
यावेळी ऋजुता दिवेकर यांनी आपल्या आहारात खाल्ला जाणारा भात हा आरोग्याच्या फायद्यांनी परिपूर्ण आहे. तसेच भात हा चांगल्या गुणाने सूचीबद्ध केले असून भाताचे अनेक फायदे आपल्या शरीराला होतो. जे तुमचे संपूर्ण आरोग्य निरोगी ठेवण्यास मदत करतात. चला जाणून घेऊयात भाताचे चांगले फायदे काय आहेत?
भात खाण्याचे फायदे:
भात हा उर्जेचा भंडार आहे. भातामध्ये असलेली कार्बोदके (carbohydrates) शरीराला उर्जा पुरवण्याचे काम करतात. तसेच तांदूळ आपल्या आतड्याच्या आरोग्यासाठी चांगले आहे आणि निरोगी जीवाणूंसाठी पोषक वातावरण वाढवते.
तांदूळ खूप अष्टपैलू आहे आणि विविध प्रकारे शिजवला जातो. तुम्ही तो भात बनवण्यापासून ते भाताची खीर बनवण्यापर्यंत विविध प्रकार तयार केले जातात.
भात हा रक्तातील साखरेवर योग्य प्रमाणात नियंत्रण ठेवले जाते. तर पोषणतज्ञ दिवेकर यांनी हा भात तुम्ही डाळी, दही, कढी, शेंगा, तूप अगदी मांस या पदार्थांबरोबर खाऊ शकतात.
भात हा पचायला कठीण नसतो. भात पचवण्यास अगदी हलका असतो. यामुळे तुमच्या शरीराला सतत एनर्जी पुरवण्याचे काम करते.
वृद्धत्व पासून आणि अगदी लहान मुलांनी देखील भात खाल्ले पाहिजे. कारण भात खाल्ल्याने चांगली झोप येते. याने हार्मोनचे संतुलन चांगले राहते.
तुम्ही कधी विचार केला आहे की तुमच्या आवडत्या डाळीबरोबर रोजचे भाताचे सेवन केल्याने तुमच्या त्वचेसाठी फायद्याचे ठरू शकते. कारण भात हे त्वचेवरील प्रोलॅक्टिनच्या उच्च पातळीसह वाढलेल्या छिद्रांपासून मुक्त करते.
तांदूळाच्या पाण्याचा उपयोग केल्यास तुमच्या रूक्ष आणि कोरड्या केसांची समस्या दूर होऊ शकते. या पाण्याचा वापर केल्याने केसांचं टेक्श्चर चांगलं होतं.