चॉकलेट लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाला आवडतं. आजकाल लोक एकमेकांना भेटवस्तू आणि मिठाईच्या स्वरूपात चॉकलेट देऊ लागले आहेत. तसंच डार्क चॉकलेटही काही लोक खाणं पसंत करतात. ते चवीने कडू जरी असले, तरी ते बऱ्याच लोकांच आवडतं आहे. मात्र, तुम्हाला माहित आहे का, डार्क चॉकलेट आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. त्यामध्ये भरपूर पोषक आहेत जी आपल्या शरीरासाठी चांगली असतात. कोकोच्या बियापासून बनवलेले डार्क चॉकलेट हे अँटी-ऑक्सिडंट्सचे सर्वोत्तम स्रोत आहे, जे आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर मानले जाते. परंतु चव आणि पोषक तत्वांनी समृद्ध असलेले डार्क चॉकलेट त्वचेसाठीही फायदेशीर आहे हे फार कमी लोकांना माहीत असेल. त्वचेचा टोन काहीही असो, डार्क चॉकलेट त्वचा चमकदार आणि निरोगी ठेवते. चला जाणून घेऊया त्वचेसाठी डार्क चॉकलेटचे फायदे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

डार्क चॉकलेट त्वचेसाठी फायदेशीर

डार्क चॉकलेटमध्ये आढळणारे बायोॲक्टिव्ह कंपाऊंड तुमच्या त्वचेसाठी खूप चांगले असतात. याशिवाय डार्क चॉकलेटमध्ये आढळणारे फ्लेव्होनॉइड्स सूर्याच्या किरणांपासून त्वचेचे संरक्षण करतात. इतकेच नाही तर त्वचेतील रक्त प्रवाह सुधारण्यासाठी आणि त्यांना हायड्रेट ठेवण्यासाठीही डार्क चॉकलेट उपयुक्त मानले जाते. त्वचा निरोगी ठेवण्यासाठी आणि आंतरिक पोषणासाठी चॉकलेट खाणे फायदेशीर ठरू शकते.

रॅडिकल डॅमेज प्रतिबंधित करते

अँटिऑक्सिडंटने समृद्ध, डार्क चॉकलेट त्वचेला रॅडिकल नुकसान होण्यापासून वाचवते. याशिवाय ते त्वचेचे प्रदूषण आणि त्वचारोग निर्माण करणाऱ्या घटकांपासूनही संरक्षण करते. तसेच, डार्क चॉकलेटमध्ये असलेला कोको आपली त्वचा गुळगुळीत आणि मुलायम ठेवण्यास मदत करतो.

सूर्याच्या हानिकारक किरणांपासून संरक्षण

डार्क चॉकलेट सूर्याच्या हानिकारक किरणांपासून त्वचेचे संरक्षण करण्यास मदत करते कारण कोकोमुळे त्वचेला भरपूर आर्द्रता मिळते आणि खराब झालेल्या त्वचेच्या पेशी देखील आतून दुरुस्त होतात. त्यामुळे सूर्याच्या हानिकारक किरणांपासून डार्क चॉकलेट तुम्हाला नक्की वाचवू शकेल.

त्वचा डिटॉक्स करण्यासाठी

आपण जे काही खातो त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर तसेच त्वचेवर दिसून येतो. ऊन, धूळ आणि प्रदूषणामुळे आपल्या त्वचेवर अनेक प्रकारची विषारी द्रव्ये जमा होतात. याशिवाय जैविक कार्यांमुळे शरीरात हानिकारक टॉक्सिन्सही तयार होतात, ज्यांना चॉकलेट साफ करण्याचे काम करते. यासोबतच त्वचेचे छिद्र स्वच्छ करून ते निरोगी ठेवतात. त्यामुळे त्वचा मोकळा श्वास घेऊ शकते आणि निरोगी राहते.

डार्क चॉकलेटचा तुम्ही फेस पॅक बनवूनही लावू शकता

१) यासाठी डार्क चॉकलेट पावडर आणि मुलतानी माती पावडर समप्रमाणात घ्या आणि त्यात गुलाबजल टाकून चांगले मिसळा. आता ते चेहऱ्यावर लावा आणि कोरडे झाल्यानंतर थंड पाण्याने धुवून टाका. त्यांनंतर त्वचेचा हिशोबाने चांगले मॉइश्चरायझर लावा.

२) त्वचा चमकदार ठेवण्यासाठी दोन चमचे डार्क चॉकलेट पावडर, एक चमचा मध आणि एक चमचा दूध एकत्र करून पेस्ट बनवा. आता चेहऱ्यावर लावा आणि कोरडे झाल्यानंतर धुवा. यामुळे तुमची त्वचा चमकदार आणि तजेलदार बनेल.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Love to eat dark chocolate so know its amazing benefits for the skin gps