अयोग्य जीवनशैली आणि अपौष्टिक आहाराच्या अभावामुळे कोलेस्टेरॉल, मधुमेह आणि हृदयाशी संबंधित आजार वाढले आहेत. या आजारांना टाळण्यासाठी पौष्टिक, सकस आहाराचे सेवन केले पाहिजे. काही खाद्यपदार्थ हे आजार टाळण्यात मदत करू शकतात. ज्या खाद्यपदार्थांचे ग्लायसेमिक इंडेक्स कमी असते, ते आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकतात, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अन्न पदार्थ रक्तातील साखरेची पातळी किती लवकर आणि किती वाढवतात या आधारावर त्यांना ग्लायसेमिक इंडेक्स मुल्य दिले जाते. कमी ग्यालसेमिक इंडेक्स असलेले अन्न वजन कमी करण्यास मदत करतात आणि टाइप २ मधुमेह आणि हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी रोगांचा धोका कमी करतात. ५५ किंवा त्यापेक्षा कमी जीआय असलेले खाद्यपदार्थ हे निम्न श्रेणीत येतात. ५६ – ६९ जीआय असलेले खाद्यपदार्थ मध्यम श्रेणीत, तर ७० पेक्षा अधिक जीआय असलेले पदार्थ उच्च श्रेणीत येतात. जी आय जितका कमी असेल तितका ब्लड शुगर स्पाईक कमी दिसून येतो, असे आहारतज्ज्ञ गरिमा गोयल यांचे म्हणणे आहे.

(प्रोस्टेट कर्करोगाचा धोका टाळा, जीवनशैलीत करा ‘हे’ बदल)

कमी जीआय असलेले खाद्यपदार्थ मधुमेह, टाळण्यात, कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यात, वजन कमी करण्यात आणि कॅन्सरचा धोका कमी करण्यात मदत करतात. असे खाद्यपदार्थ हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी रोगही टाळण्यास मदत करतात. हे खाद्यपदार्थ कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यात मदत करतात ज्याचा संबंध हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगांशीही आहे, अशी माहिती गरिमा यांनी दिली.

कमी जीआय असलेले पदार्थ कोणते?

  • बटाट्याऐवजी रताळे खा. हे दोन्ही आरोग्यासाठी फायदेशीर आहेत, मात्र रताळ्याचे जीआय हे बटाट्यापेक्षा कमी आहे.
  • एका आहारात क्विनोआ, बकव्हिट किंवा अमरनाथ सारख्या तुणधान्यांचा वापर करा.
  • पांढऱ्या पाव ऐवजी व्होलग्रेन तपकिरी पाव खा. व्होलग्रेन ब्रेडमधून अनेक पोषक तत्व मिळतात.
  • इन्स्टंट ओट ऐवजी स्टील कट ओटचे सेवन करा.
  • पॅकेटमध्ये असलेले कॉर्नफ्लेक्स खाण्याऐवजी स्टील कट ओटचे सेवन करा. पॅक केलेले खाद्यपदार्थ मोठ्या प्रमाणात प्रक्रिया केलेले असताता आणि त्यात भरपूर प्रमाणात साखर असते.
  • पांढऱ्या तांदळाऐवजी तपकिरी तांदळाचा वापर करा. तपकिरी तांदळात भरपूर प्रमाणात फायबर असते.

(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या.)

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Low gi food that could decrease fat and improve cardiovascular health ssb
Show comments