लहानमुलांमध्ये ‘व्हिटॅमिन डी’च्या कमतरेतेमुळे रक्ताक्षयाचा धोका निर्माण होत असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे. नव्याने अभ्यास करण्यात आलेल्या माहितीनुसार, लहानमुलांच्या शरिरातील ‘व्हिटॅमिन डी’चे प्रमाण ३० नॅनो ग्रॅमपेक्षा कमी असल्यास त्यांना रक्तक्षयाचा धोका संभवतो. त्यामुळे ‘व्हिटॅमिन डी’युक्त पदार्थांचा आहार लहानमुलांनी जास्त करणे गरजेचे असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे. तसेच शुभ्रवर्णीय मुलांपेक्षा कृष्णवर्णीय मुलांमध्ये ‘व्हिटॅमिन डी’चे प्रमाण कमी असल्याचेही आढळून आले आहे. जेवढे व्हिटॅमिन डीचे शरिरातील प्रमाण कमी तेवढा रक्तक्षयाचा धोका अधिक असल्याचेही समोर आले आहे.  

Story img Loader