Red rid of bugs: अनेकदा वातावरणातील मॉईश्चर आणि घरातील फर्निचर, बिछाना वेळोवेळी साफ न केल्यास घरामध्ये ढेकूण निर्माण होतात. जे एकदा झाले की अनेक प्रयत्न करूनही लवकर कमी होत नाहीत. तसेच त्यांनी अंडी घातल्यावर त्यांची संख्या झपाट्याने वाढते आणि हे घरातील फर्निचरच्या वस्तू, बिछान्यांमध्ये लपतात. अंथरुणात लपलेले ढेकूण अंथरुणावर झोपणाऱ्या व्यक्तीचे रक्त शोषून घेतात, ज्यामुळे ढेकूण चावल्यावर त्या व्यक्तीला रात्रभर झोप लागत नाही. अशा परिस्थितीत ढेकणांपासून सुटका करून घेण्यासाठी कोणते उपाय करायला हवे हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

ढेकणांपासून अशी करा सुटका

लसूण

लसणाचा वास खूप उग्र असतो, त्यामुळे पाण्यात लसणाचे बारीक तुकडे करून मिसळा आणि हे पाणी फर्निचर आणि अंथरुणावर शिंपडा. लसणाच्या उग्र वासाने ढेकूण पळून जातील.

कडुलिंब

कडुलिंबामध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात, जे ढेकूण दूर करण्यासाठी प्रभावी ठरू शकते. यासाठी कडुलिंबाची पाने व्यवस्थित उकळून घ्यावी आणि थंड झाल्यावर हे पाणी स्प्रे बॉटलमध्ये भरून फर्निचर आणि अंथरुणावर फवारावे, यामुळे ढेकूण कमी होतील.

बेकिंग सोडा

एक ग्लास पाण्यामध्ये बेकिंग सोडा घालून तो नीट ढवळून घ्यावा आणि हे मिश्रण स्प्रे बॉटलमध्ये भरून बेडवर फवारावे.

सूर्यप्रकाश

ढेकूण पळवून लावण्यासाठी सूर्यप्रकाशदेखील खूप महत्त्वाचा आहे. यासाठी आठवड्यातून दोन-तीन वेळा अंथरुण, गादी सूर्यप्रकाशात ठेवा आणि त्यावर काठीने मारा. यामुळे अंथरुण आणि गादीतील धूळ, घाण जमा होण्यास प्रतिबंध होतो. तसेच ढेकूणही होत नाहीत.

हेही वाचा: घरात झुरळांचा सुळसुळाट वाढत चाललाय? ‘या’ सोप्या टिप्स करतील झुरळांचा नायनाट

लव्हेंडर तेल

लव्हेंडर तेलाचा वापर लहान कीटकांना दूर करण्यासाठी केला जातो. त्यामुळे ढेकणांपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही लव्हेंडर तेलाचाही उपयोग करू शकता.