Maharastrian Recipes : वरणभात हा भारतीय आहारातील लोकप्रिय आणि तितकाच महत्त्वाचा पदार्थ आहे. अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत अनेक जण वरणभाताचा आस्वाद घेतात. वरणभाताशिवाय अनेकांचे जेवणच पूर्ण होऊ शकत नाही. शिवाय हे जेवण फक्त स्वादिष्ट व रुचकरच नाही, तर तो आरोग्यासाठी तितकाच संतुलित आहारही आहे. पण वरणभात बनविताना काही वेळा भात खूपच मऊ, फडफडीत किंवा गिळगिळीत होतो; तर वरण खूप पातळ किंवा फार घट्ट होते. अशा वरणभातामुळे जेवणाची पूर्ण चवच बिघडून जाते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अशा वेळी मोकळा व पुरेसा मऊ असा चांगला भात अन् रुचकर वरण बनविण्यासाठी तांदूळ किती प्रमाणात घ्यावे, त्यात पाणी किती असावे, तसेच वरण पातळ किंवा घट्ट होऊ नये म्हणून काय करावे? याविषयी डॉ. वर्षा जोशी यांच्या ‘स्वयंपाक शाळा पुस्तकातून आपण काही सोप्या टिप्स जाणून घेऊ…

दररोज नारळाच्या पाण्यात ‘हा’ पदार्थ टाकून प्या; वाढत्या वजनासह बद्धकोष्ठतेचा त्रास होईल दूर?

भात बिघडू नये म्हणून ‘या’ गोष्टींकडे लक्ष द्या

१) भात पुरेसा मऊ आणि मोकळा होण्यासाठी तांदळात पाणी किती घालतो हे फार महत्त्वाचे असते. पाण्याचे प्रमाण चुकले की भात बिघडतो.
२) साधारणपणे भात शिजविताना तांदळाच्या दुप्पट पाणी ठेवणे हे योग्य प्रमाण असते. पण तांदूळ नवीन आहे की जुना त्यानुसार पाण्याचे प्रमाण कमी-जास्त होऊ शकते.
३) तांदूळ आंबेमोहरासारखा बुटका असेल, तर तो वरणभातासाठी चांगला असतो. कारण- त्याचा भात जरा चिकट होतो.
४) वरणभात, आमटीभात यांसाठी, तसेच भाताची मूद पाडण्यासाठी असा भात अगदी योग्य ठरतो.

वरण पातळ किंवा घट्ट होऊ नये म्हणून फॉलो करा ‘या’ टिप्स

१) भातावर घालायचे वरण अधिक पातळ किंवा घट्ट झाले, तर भात पाणचट लागतो; तसेच घट्ट वरण भातात कालवल्यावर ते अधिकच घट्ट होते.
२) अशा वेळी डाळ शिजविताना त्यात थोडे हिंग, थोडी हळद व थोडे तेल घाला; ज्यामुळे डाळ शिजली की, टचटचीत राहत नाही; शिवाय मऊ शिजते आणि चवीला रुचकर लागते.
३) डाळीत पुरेसे पाणी घालून, ती घट्ट होईपर्यंत शिजवली आणि त्यात थोडे पाणी घालून वरण केले, तर ते चांगले होते.
४) डाळीप्रमाणे आमटी बनवितानाही हीच पद्धत वापरा.
५) डाळ किंवा आमटी फार पातळ झाल्यास भाताबरोबर त्याची चव चांगली लागत नाही.
६) त्यात आमटी भातात कालवल्यावर आमटीतल्या सहा रसांची चव मिळण्याऐवजी फक्त डाळीची चव लागते.

वरणभात किंवा आमटीभात बनवताना तुम्ही वरील टिप्स फॉलो केल्यास जेवण चविष्ट अन् रुचकर होते.