Maha Shivratri Recipe 2022: हिंदू कॅलेंडरनुसार, महाशिवरात्री हा सण दरवर्षी फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला साजरा केला जातो. भगवान शिव आणि माता पार्वतीचा विवाह या दिवशी झाला, जो दरवर्षी महाशिवरात्री म्हणून साजरा केला जातो. यावेळी १ मार्च २०२२ रोजी शिवरात्रीचा उत्सव साजरा होत आहे. ही महाशिवरात्र ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीकोनातून खूप खास असणार आहे. अशा वेळी उपवास करताना मसालेदार जेवणाची लालसा शमवायची असेल तर वरईच्या तांदळाची किंवा उपवासाच्या पिठापासून बनवलेली ही चटपटीत टिक्की करून पहा. चला जाणून घेऊया ही चविष्ट रेसिपी कशी बनते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

टिक्की बनवण्यासाठी साहित्य

वरईचा तांदूळ – १ कप

उकडलेले बटाटे – २

सैंधव मीठ- चवीनुसार

काळी मिरी – १ टीस्पून

हिरवी मिरची -१

बारीक चिरलेली कोथिंबीर – १ कप

तूप – आवश्यकतेनुसार

टिक्की कशी बनवायची?

टिक्की बनवण्यासाठी प्रथम वरईचा तांदूळ थोडा वेळ भिजवावा, त्याचे पाणी वेगळे करून बारीक वाटून घ्या.

आता या पेस्टमध्ये सर्व साहित्य एकत्र करून पेस्ट बनवा.

आता या मिश्रणाला टिक्कीचा आकार देत टिक्की तयार करा.

आता गॅसवर नॉन स्टिक पॅन गरम करून त्यात थोडं तूप लावून सर्व टिक्की एक एक करून मंद आचेवर बेक करा.

टिक्की दोन्ही बाजूंनी सोनेरी होईपर्यंत बेक करा आणि प्लेटमध्ये काढून हिरव्या चटणीबरोबर सर्व्ह करा.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maha shivratri 2022 make a spicy fasting tikki for mahashivaratri learn the recipe ttg