Dr. Babasaheb Ambedkar Mahaparinirvan Din 2024 WhatsApp Status, Messages : महापरिनिर्वाण दिवस हा भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा स्मृतिदिन म्हणून पाळला जातो. ६ डिसेंबर १९५६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे दिल्ली येथे महापरिनिर्वाण (निधन) झाले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी ७ डिसेंबर रोजी मुंबईतील चैत्यभूमी येथे त्यांच्यावर बौद्ध पद्धतीने अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यामुळे दरवर्षी ६ डिसेंबरला जगातून, तसेच देशभरातून मोठ्या संख्येने अनुयायी चैत्यभूमीवर एकत्र येत, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना अभिवादन करतात.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय जातिव्यवस्थेतील हरिजन समाजाच्या सुधारणेसाठी भरीव काम केले. अस्पृश्यतेची प्रथा संपविण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा होता. डॉ. बाबासाहेबांनी बौद्ध धर्माचा अभ्यास करून, भगवान गौतम बुद्धांची शिकवण तळागाळातील सर्व लोकांपर्यंत पोहोचवली. त्यांनी मागास समाजाला शिक्षणाचा हक्क मिळवून दिला.

pushpa 2 song controversy
चेंगराचेंगरीनंतर ‘पुष्पा २’बद्दल नवा वाद, निर्मात्यांना युट्युबवरून हटवावं लागलं ‘हे’ लोकप्रिय गाणं; कारण काय?
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Heart touching video of a kid crying and asking mother to come early from work emotional video viral on social media
रडत रडत तिच्याजवळ गेला अन्…, कामावर जाणाऱ्या आईला मुलाची विनवणी, VIDEO पाहून तुमचेही डोळे पाणावतील
Surya-Shukra Yuti 2025
‘या’ तीन राशीच्या व्यक्तींचे नशीब फळफळणार; सूर्य-शुक्राची युती नव्या वर्षात करणार मालामाल
prathamesh parab regret for not getting enough screens
“महाराष्ट्रात स्क्रिन्स मिळत नाहीयेत यापेक्षा दुर्दैव…”, प्रथमेश परबने व्यक्त केली खंत; म्हणाला, “मायबाप प्रेक्षकांपर्यंत…”
yogita chavan troll for celebrating christmas
ख्रिसमस सेलिब्रेशनमुळे योगिता चव्हाण ट्रोल; पती सौरभ सडेतोड उत्तर देत म्हणाला, “मराठी भाषेचा, संस्कृतीचा प्रचार…”
Bipasha Basu
Video: बिपाशा बासूने शेअर केला लाडक्या लेकीचा व्हिडीओ; ‘देवी’ने जिंकली चाहत्यांची मने, पाहा व्हिडीओ
Mangal Margi 2025
२०२५ मध्ये मंगळाचा जबरदस्त प्रभाव; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना मिळणार भाग्याची साथ

दरवर्षी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या कार्याला अभिवादन करण्यासाठी देशासह जगभरातील अनुयायी चैत्यभूमी (दादर) शिवाजी पार्क येथे दाखल होतात. अनेकजण सोशल मीडियाच्या माध्यमातूनही एकमेकांना संदेश पाठवून या महापुरुषाच्या स्मृतीस उजाळा देतात, त्याप्रमाणे तुम्ही देखील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त तुम्ही खास HD Images, WhatsApp Status, Messages द्वारे महामानवाच्या स्मृतींना अभिवादन करू शकता.

महापरिनिर्वाण दिन स्टेटस | Mahaparinirvan Din Wishes in Marathi 2024

१) राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव,
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना
विनम्र अभिवादन…!

२) आचार-विचारांत भरली राष्ट्रनिष्ठा, लोकांच्या न्याय्य हक्कांसाठी प्रयत्नांची केली पराकाष्ठा
त्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस महापरिनिर्वाणदिनी विनम्र अभिवादन!

महापरिनिर्वाण दिन २०२४ शुभेच्छा संदेश कोट्स

३) देशात एकता, समता, बंधुता नांदावी
म्हणून आयुष्यभर झटणाऱ्या महामानवाला
महापरिनिर्वाण दिनानिमित्त कोटी कोटी प्रणाम!!

४) विश्वरत्न, भारतरत्न, प्रज्ञासूत्र, क्रांतिसूर्य, भारतीय घटनेचे शिल्पकार, महामानव, परमपूज्य, बोधिसत्त्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन!

Mahaparinirvan Din 2024 Wishes Quotes in Marathi
महापरिनिर्वाण दिन २०२४ शुभेच्छा संदेश कोट्स

५) एक उत्तम कलाप्रेमी, शिक्षणप्रेमी,
गुणवंत, बुद्धिमान असे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असलेल्या
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनी कोटी कोटी प्रणाम…!

Mahaparinirvan Din 2024 Wishes Quotes in Marathi
महापरिनिर्वाण दिन २०२४ शुभेच्छा संदेश कोट्स

महापरिनिर्वाण दिनानिमित्त वाचा डॉ. बाबासाहेबांचे विचार | Mahaparinirvan Din 2024 Quotes In Marathi

१) तुमच्याकडे २ रुपये असतील,
तर १ रुपयाची भाकरी घ्या,
आणि १ रुपयाचे पुस्तक..
भाकरी तुम्हाला जगण्यास मदत करेल,
तर पुस्तक ‘जगावे कसे’ हे शिकवेल..
– भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर

२) स्वातंत्र्य विचारसरणीचं, स्वातंत्र्य वृत्तीचं निर्भय नागरिक व्हा !
– भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर

३) अपयश कधीच अंतिम नसते
तुमचे प्रयत्न तोपर्यंत सुरू ठेवा
जोपर्यंत तुमचा विजय इतिहास बनत नाही
– भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर

४) बुद्धिमत्तेचा विकास हे मानवी अस्तित्वाचे अंतिम लक्ष्य असले पाहिजे.
– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

५) बोलताना विचार करा
बोलून विचार करू नका.
– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

Story img Loader