Maharashtra Day 2022 Wishes In Marathi: महाराष्ट्र दिन दरवर्षी १ मे (1 May) रोजी साजरा केला जातो. १९६० मध्ये या दिवशी महाराष्ट्राच्या रूपाने भारताला नवे राज्य मिळाले. राज्यभरात महाराष्ट्र दिन मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात येतो. या दिवशी राज्यात सरकारी सुट्टी असते. हा दिवस साजरा करण्यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे परेड, उत्सव इत्यादींचे आयोजन केले जाते. या सोहळ्यांमध्ये राज्याचे राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्यासह अनेक बडे नेते आणि इतर लोक तसेच सामान्य माणूसही सहभागी होतो. या खास दिनी तुमच्या मित्रपरिवाराला, कुटुंबाला शुभेच्छा देण्यासाठी काही खास मेसेज घेऊन आलो आहोत.
बाप महाराष्ट्राचा, महाराष्ट्राची माय,
रयतेचे छत्रपती आमचे शिवराय…
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!
(हे ही वाचा: Maharashtra Day 2022: महाराष्ट्र दिन कसा आणि कधी सुरु झाला? जाणून घ्या रंजक इतिहास!)
दगड होईन तर सह्याद्रीचा होईन
माती झालो तर महाराष्ट्राची होईन
तलवार झालो तर आई भवानीची होईन
जय भवानी जय शिवाजी
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!!
महाराष्ट्राच्या या सुवर्ण दिवशी आपण एकत्र येऊन शपथ घेऊया की,
महाराष्ट्राला येत्या वर्षात नव्या उंचीवर नेऊ.
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!
धन्य आहे ही महाराष्ट्राची माती
कोटी कोटी नमन या पवित्र धरणीला
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!
जय जय महाराष्ट्र माझा..
गर्जा महाराष्ट्र माझा..
महाराष्ट्रदिन आणि कामगार दिन
निमित्त आपणास
हार्दिक शुभेच्छा..!
लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी…
मराठी भाषिकांना आणि महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाला,
महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा!!
धन्य आहे ही महाराष्ट्राची माती
कोटी कोटी नमन या पवित्र धरणीला
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!
मंगल देशा
पवित्र देशा
महाराष्ट्र देशा
प्रणाम घ्यावा माझा हा महाराष्ट्र देशा
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!
जय महाराष्ट्र
(क्रेडीट: सोशल मीडिया)