Happy Mahavir Jayanti 2023 Wishes : दरवर्षी चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील त्रयोदशीला महावीर जयंती साजरी केली जाते. यावर्षी ३ एप्रिल रोजी महावीर जयंती साजरी केली जाणार आहे. महावीर जयंती हा जैन धर्मियांचा सर्वात मोठा सण आहे. भगवान महावीर यांना वर्धमान या नावानेही ओळखले जाते. भगवान महावीर हे २४ वे आणि शेवटचे जैन ऋषी मानले जातात. त्यामुळे त्यांचा जन्मदिवस जैन धर्मियांसाठी हा एक शुभ दिवस असतो. जैन धर्माचे शेवटचे आध्यात्मिक गुरु (महावीर) यांच्या स्मरणार्थ जगभरातील जैन समुदाय हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करतात.

या दिवशी जैन धर्माचे २४ वे तीर्थंकर महावीर स्वामी यांचा जन्म बिहारमधील वैशाली कुंड गावात झाला. धर्मग्रंथानुसार, महावीर स्वामींचा जन्म बिहारच्या कुंडा गावात इ.स.पू. ५९९ मध्ये  लिच्छवी घराण्याचे महाराज सिद्धार्थ आणि राणी त्रिशाला यांच्या पोटी झाला. जैन धर्माचे २४ वे तीर्थंकर महावीर स्वामी यांचे बालपणीचे नाव वर्धमान होते. वयाच्या 30 व्या वर्षी महावीर स्वामींनी भौतिक सुखांचा त्याग केला आणि आध्यात्मिक जीवन स्वीकारले. त्यावेळी महावीर स्वामींनी सलग १२ वर्षे कठोर तपश्चर्या केली, ज्याद्वारे त्यांनी आपल्या सर्व इंद्रियांवर विजय मिळवला होता. नंतर त्यांनी दिगंबर रूप स्वीकारले.त्यामुळे त्यांना महावीर या नावाने ओळख मिळाली. या आनंदाच्या दिवसानिमित्ताने लोक एकमेकांना मेसेज पाठवून महावीर जयंतीच्या शुभेच्छाही देतात. यामुळे तुम्ही देखील तुमच्या प्रियजनांना, मित्र-मैत्रिणींना मेसेज पाठवून महावीर जयंतीच्या शुभेच्छाही देऊ शकता-

Morya Gosavi Sanjeev Samadhi Festival begins in chinchwad Pune news
पिंपरी: मोरया गोसावी संजीवन समाधी महोत्सवाला मंगळवारपासून प्रारंभ; सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांची उपस्थितीती
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Tuberculosis awareness campaign for 100 days in Nashik district
नाशिक : जिल्ह्यात शंभर दिवसांसाठी क्षयरोग जागृती मोहीम
restoration work of Tuljabhavani temple is underway under supervision of Archaeological Department
तुळजाभवानी मंदिराला मिळणार पुरातन झळाळी, जीर्णोध्दाराचे काम पुरातत्व खात्याच्या निगराणीखाली वेगात सुरू
News About Marathi Drama Urmilyan
‘उर्मिलायन’ महाकाव्यातून उलगडणार रामायणातील लक्ष्मणच्या पत्नीचं कथाख्यान, ‘या’ दिवशी होणार शुभारंभाचा प्रयोग
Shiv Pratap Din celebrated at Pratapgad Flowers showered from helicopter on Chhatrapati equestrian statue satara news
अलोट उत्साहात प्रतापगड येथे शिवप्रताप दिन साजरा; छत्रपतींच्या अश्वारूढ पुतळ्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवर्षाव
Tuljabhavani Devi, Shakambhari Navratri festival,
धाराशिव : तुळजाभवानी देवीच्या शाकंभरी नवरात्र महोत्सवास ७ जानेवारीपासून प्रारंभ
sharad pawar elected guest president for 98 akhil bharatiya marathi sahitya sammelan
शरद पवार साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष… हे पद किती महत्त्वाचे?

महावीर जयंती कोट्स, मेसेज (Mahavir Jayanti Quotes, Message in Marathi)

आत्मा एकटा येतो
आणि एकटा जातो,
ना त्याला कोणी आधार देत
ना कोणी मित्र बनतो.
महावीर जयंतीच्या शुभेच्छा!

संपूर्ण जगाला अहिंसा, दया क्षमा, शांती, मैत्री,
जगा आणि जगू द्या हा
संदेश देणारे भगवान महावीर
यांना आज जयंती निमित्त अभिवादन.
सर्वांना मनापासून शुभेच्छा..!

हिंसा परमो धर्मः
धर्म हिंसा तथैव च:
महावीर जयंती निमित्त
जैन बांधवाना खूप खूप शुभेच्छा

रागावर शांतीने विजय मिळवा,
दुष्टांनवर दयाळूपणाने विजय मिळवा,
आणि असत्यावर सत्यांनी विजय मिळवा!
महावीर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

सिद्धांचे सार, आचार्यांचा सहवास,
ऋषींचा सहवास, अहिंसेचा प्रचार,
हे भगवान महावीरांचे सार आहे.
महावीर जयंतीच्या शुभेच्छा!

एकही युद्ध लढले नाही, तरीही युद्ध जिंकले, अहिंसेचा, अनेकांतचा, अनंताचा मंत्र दिला
त्या जगाचा तारा असलेल्या महावीरांना कोटी कोटी वंदन, आपणही त्यांच्या मार्गावर चालत भौतिक बंधने तोडू या.
महावीर जयंतीच्या शुभेच्छा!

तुमच्या आत्म्यापलीकडे कोणीही शत्रू नाही.
खरे शत्रू तुमच्या आत राहतात.
ते शत्रू म्हणजे क्रोध, अभिमान, लोभ, आसक्ती आणि द्वेष.
महावीर जयंतीच्या शुभेच्छा!

लाखो शत्रूंवर विजय मिळवण्यापेक्षा स्वतःवर विजय मिळवणे चांगले आहे. महावीर जयंतीच्या शुभेच्छा!

ज्याचे मन निरंतर धर्मरत असते
त्याला देव देखील नमस्कार करतो.”
असा महान संदेश देणाऱ्या
भगवान महावीर यांच्या जयंतीच्या
हार्दिक शुभेच्छा!!

Story img Loader