महिंद्रा अँड महिंद्राने ग्राहकांच्या पसंतीस उतरलेल्या आपल्या लेटेस्ट एमपीव्ही (मल्टी पर्पज व्हेइकल) Mahindra Marazzo चं आठ आसनं असलेलं (8 सीटर )नवं व्हर्जन ‘माराझो एम8’ लाँच केलं आहे. माराझो 8 सीटरची एक्स शोरुम किंमत 13.98 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. सात आसनं असलेल्या व्हेरिअंटपेक्षा केवळ 8 हजार रुपये याची किंमत जास्त आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘माराझो एम8’मध्ये अँन्ड्रॉइड ऑटो आणि अॅपल कार-प्ले सपोर्टसह 7-इंच टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट सिस्टीम, रिव्हर्स पार्किंग कॅमेरा, क्रुझ कंट्रोल, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, पावर अॅड्जस्टेबल आणि फोल्डिंग विंग मिरर्स, 17-इंच अॅलॉय व्हिल्ज, डे-टाइम रनिंग लॅम्प्स आणि लेदर सीट्स अशी अनेक फीचर्स आहेत.

आठ आसनं असलेली ही कार जुन्या सात आसनं असलेल्या इंजिनासह लाँच करण्यात आली आहे. यामध्ये 1.5-लीटर डिझेल इंजिन आहे. 6-स्पीड मॅन्युअल ट्रांसमिशन इंजिनसह 123hp पावर जनरेट करतं. महिंद्रा माराझोला काही दिवसांपूर्वीच ग्लोबल एनसीएपीमध्ये 4-स्टार रेटिंग मिळाले होते. कंपनी लवकरच या शानदार कारच्या किंमतीत वाढ करणार असल्याचंही सांगितलं जात आहे.

‘माराझो’चे अनेक भन्नाट फीचर्स आहेत. गाडीचा आगळा वेगळा डॅशबोर्ड, इन्स्टुमेन्ट क्लस्टर, एसी व्हेन्ट्स आणि सीट आकर्षक आहेत. मात्र सर्वात आकर्षक गोष्ट म्हणजे छताला असलेले एसी व्हेन्ट्स. भारतात अशाप्रकारे मध्यभागी एसी व्हेन्ट्स असलेली ‘माराझो’ ही पाहिलीच गाडी ठरली आहे. डॅशबोर्ड हा सेंट्रलाइज कंन्सोल्स असणारा टी शेपमध्ये आहे. डॅशबोर्डवरच 7 इंचाची इन्फोर्मेशन टच स्क्रीन देण्यात आली असून त्यामध्ये अॅपल कारप्ले आणि अॅण्ड्रॉइड ऑटो असे दोन्ही पर्याय देण्यात आले आहेत. एक्सयुव्ही 500 आणि केयुव्ही 100 नंतरही ही महेंद्राची सर्वात प्रिमियम कार असणार आहे. नावाला साजेसे डिझाइन करण्याच्या दृष्टीने या गाडीचे डिझायनिंग करताना त्यामध्ये शार्क ग्रील्स, शार्कच्या शेपटीच्या आकाराचे टेल लाइट्स, शार्क फीन अॅण्टीना अशाप्रकारचा भन्नाट लुक देण्यात आला आहे.